ShivJayanti 2023: प्रशासनाने घेतला आग्रा किल्ल्यातील 'शिवजयंती' कार्यक्रमाचा आढावा; पाहा फोटो
आग्रा किल्ल्यातील दिवाण-ए-आममध्ये शिवजयंती साजरी करण्यासाठी संपूर्ण तयारी झाली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App'शिवजयंती' कार्यक्रमाचे आयोजक विनोद पाटील कालपासून आग्र्यात तळ ठोकून आहे.
दरम्यान आज आग्राच्या प्रशासनाने कार्यक्रमास्थळी पाहणी केली.
यावेळी आग्र्याचे जिल्हाधिकारी यांनी आढावा घेतला.
तसेच यावेळी आग्र्याचे पोलीस आयुक्त यांनी देखील परिसराचा आढावा घेतला.
किल्ल्यावरील नियमानुसार आतमध्ये काही जणांनाच परवानगी देण्यात येणार आहे.
तर प्रशासनाला सहकार्य करण्याचा शब्द देत त्यांच्या अटी मान्य केल्याची माहिती विनोद पाटील यांनी दिली आहे.
तर शिवभक्तांसाठी किल्ल्याच्या समोरील शिवछत्रपतींच्या पुतळ्याजवळ स्क्रीनच्या माध्यमातून कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे.
तसेच सर्वांच्या उपस्थितीत भव्य आतिषबाजी पुतळ्याजवळच होणार आहे.