Photo: संजय राऊतांवर गुन्हा दाखल करा, शिंदे गटाकडून पोलीस ठाण्यात ठिय्या
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी संजय राऊत यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जात आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशिंदे गटाकडून संजय राऊत यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जात आहे.
औरंगाबादमध्ये देखील शिंदे गटाचे पदाधिकारी आक्रमक झाले आहे.
संजय राऊत यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करत पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
मात्र गुन्हा दाखल होईपर्यंत पोलीस ठाण्यासमोरून हलणार नसल्याची भूमिका शिंदे गटाने घेतली आहे.
शहरातील जवाहर नगर पोलीस ठाण्यात शिंदे गटाने यासाठी ठिय्या आंदोलन सुरु केले आहेत.
यावेळी संजय राऊत यांच्याविरोधात शिंदे गटाकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे.
तर शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख राजेंद्र जंजाळ यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यासमोरच ठिय्या मांडल्या आहेत.