Ayodhya Ram Mandir : राम मंदिराचे नवे फोटो पाहिले का? राम मंदिर लोकार्पण सोहळ्याचा सर्वत्र जल्लोष!
देशभरातील सर्व स्तरातील लोकांमध्ये राम मंदिराविषयी प्रचंड उत्साह आहे. या राम मंदिराचे नवे फोटो पाहा... (Photo credit : Twitter/@ShriRamTeerth)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appभारताच्या इतिहासामध्ये 22 जानेवारी 2024 चा दिवस सुवर्ण अक्षरात नोंदवला जाईल, कारण या दिवशी अनेक वर्षांनी रामलल्ला अयोध्येतील त्यांच्या भव्य राम मंदिरात निवास करतील. (Photo credit : Twitter/@ShriRamTeerth)
अयोध्या येथील प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा येत्या 22 जानेवारीला होणार आहे. या नेत्रदीपक आणि ऐतिहासिक सोहळ्याकडे साऱ्या जगाचे लक्ष लागले आहे. (Photo credit : Twitter/@ShriRamTeerth)
या राम मंदिर लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने जगभरातील रामभक्त आपली सेवा प्रभू श्रीरामाच्या चरणी अर्पण करण्यासाठी प्रयत्न करत आहे. (Photo credit : Twitter/@ShriRamTeerth)
राम मंदिराची तयारी घरोघरापासून मंदिरापर्यंत जोरात सुरु झाली आहे. त्यामुळं दिवे, सजावटीचे साहित्य खरेदीसाठी बाजारपेठेत नागरिकांची गर्दी होत आहे. (Photo credit : Twitter/@ShriRamTeerth)
अयोध्येत राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची जोरदार तयारी सुरु आहे. येथे मोठ्या संख्येने भाविक दाखल होणार असल्याने प्रशासन आणि मंदिर ट्रस्टकडून आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहेत. (Photo credit : Twitter/@ShriRamTeerth)
अयोध्या राम मंदिराचे कोषाध्यक्ष स्वामी श्रीगोविंद देवगिरी महाराज, गणेश्वर शास्त्री द्रवीड, प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे आचार्य लक्ष्मीकांत दिक्षीत, केशव गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली विशाल केले यांनी धुळे जिल्ह्यातील सोनगीर येथील बिपीन कासार व गावातील काही कारागिरांनी 200 तांब्याचे कलश आतापर्यंत बनवले आहेत. (Photo credit : Twitter/@ShriRamTeerth)
अवघा देश श्रीराममय झाला आहे. श्री रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा होताना भारतातच नव्हे जगभरातील रामभक्त आनंदोत्सव साजरा करण्याच्या तयारीत आहेत. (Photo credit : Twitter/@ShriRamTeerth)
नागपूर येथील प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी आजवर आपल्या नावे अनेक विश्व विक्रम नोंदविले आहे. यंदाच्या वेळी विशेष बाब म्हणजे अयोध्येत तब्बल 7 हजार किलो शिरा (हलवा) ते तयार करणार आहे. प्रभू श्रीरामांना भोग लावल्यानंतर हा खास शिरा अयोध्येत येणाऱ्या दीड लाख राम भक्तांना प्रसाद म्हणून दिला जाणार आहे. (Photo credit : Twitter/@ShriRamTeerth)
इंग्लंडची राजधानी लंडनच्या राम भक्तांनी तिथल्या मंदिरांमध्ये राम शिरा प्रसाद म्हणून वाटण्याचे ठरविले आहे. प्रसादाचे खास 15 डबे नागपुरातून लंडनला रवाना.. (Photo credit : Twitter/@ShriRamTeerth)