Cauliflower benefits : रोजच्या आहारातला फ्लॉवर अनेक आजारांवर गुणकारी! जाणून घ्या फायदे..
फ्लॉवरमध्ये फायबर,व्हिटॅमिन सी, कॅल्शियम, अँटीऑक्सिडेंट , प्रोटीन, कार्बोहाइड्रेट, पोटॅशिअम यांसारखे पोषक घटक असतात, जे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. (Photo Credit : pixabay)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appफ्लॉवरमधील 'व्हिटॅमिन सी' कोलेजनचे उत्पादन सुधारते जे त्वचेला मॉइश्चरायझिंग करण्यासाठी उपयुक्त ठरते. चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होतात, त्वचा कोरडी राहत नाही. (Photo Credit : pixabay)
फ्लॉवर दाहक-विरोधी गुणधर्मानी समृद्ध आहे. आपली रोग प्रतिकारकशक्ती वाढवण्यास मदत करतो. रक्त शुद्ध होण्यासाठी कच्चा फ्लॉवर खाणे आरोग्यास उत्तम ठरते. (Photo Credit : pixabay)
फ्लॉवरमध्ये आढळणारे 'व्हिटॅमिन सी' डोळ्यांच्या रक्तवाहिन्यांसाठी चांगले असते. मोतीबिंदू होण्याचा धोका कमी होतो. (Photo Credit : pixabay)
फ्लॉवरमुळे कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहते आणि लठ्ठपणा कमी होऊन, वजन नियंत्रणात राहते. (Photo Credit : pixabay)
फ्लॉवरमध्ये अँटीऑक्सिडेंट पोषक घटक असतात त्यामुळे शरीरातून मुक्त रॅडिकल्स काढून टाकण्यास मदत करतात. (Photo Credit : pixabay)
फ्लॉवर खाल्ल्यामुळे शरीरातील पेशींचे कार्य मजबूत राहते. सांधेदुखी कमी होते आणि हाडे मजबूत राहतात. (Photo Credit : pixabay)
फ्लॉवरमध्ये 'व्हिटॅमिन के' मोठ्या प्रमाणात आढळून येते त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहण्यास मदत होते. (Photo Credit : pixabay)
फ्लॉवरमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असते, त्यामुळे नियमितपणे फ्लॉवरचे सेवन केल्यास पचनक्रिया सुरळीत होते. फ्लॉवर खाल्ल्याने मज्जासंस्थेचे कार्य सुरळीत चालते तसेच आपली स्मरणशक्ती वाढते. (Photo Credit : pixabay)
फ्लॉवर अनेक आजारांवर फायदेशीर ठरतो. फ्लॉवर खाल्ल्याने हृदयरोग, मधुमेह, कॅन्सर, किडनी स्टोन इ. विविध आजारांचा धोका कमी होतो. (Photo Credit : pixabay)
वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. (Photo Credit : pixabay)