मकर संक्रांतीनिमित्त विठ्ठल मंदिरास फळे, फुले आणि तिळगुळाची आकर्षक सजावट; रुक्मिणी मातेस वाणवसा करण्यासाठी राज्यातील हजारो महिला पंढरपुरात
या दिवशी भोगी करणे , वाण- वसा, वोवसायला जाणे या सारख्या रिती , परंपरा आजही जोपासल्या जात असतात .
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआपल्या शेतात पिकलेले नवंधान्य पहिल्यांदा विठुरायाच्या चरणी अर्पण करायचे आणि या धान्याने रुक्मिणी मातेचा वाण वसा करायची परंपरा राज्यातील सुवासिनी महिला करत असतात.
आजच्या दिवसाचे महत्व लक्षात घेत मंदिर समितीने विठ्ठल मंदिरास सुवासिक फुलांची आकर्षक सजावट केली आहे . यामध्ये फळे , भाज्या , फुले आणि तिळगुळाचा अत्यंत आकर्षक पद्धतीने वापर करून विठ्ठल रुक्मिणी मंदिराला सजविण्यात आले आहे .
यामुळे वर्षभर शेतातील पीक भरभराटीच्या येते , सर्व संकटे दूर होतात अशी या महिलांची धारणा असते . आपल्या शेतातील हरभरा , बोरे , ऊस , ज्वारी , बाजारीसह इतर धान्य घेऊन या महिला आल्या होत्या.
राठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील महिलांनी यासोबत त्यांच्या भागात पिकणारे धान्य देवाला अर्पण करण्यासाठी आणले होते . याचमुळे आज भल्या पहाटेपासून राज्यभरातील हजारो महिला आपल्या शेतातील नवधान्यासह श्री विठ्ठल रुख्मिणी मंदिरात दाखल झाल्या होत्या .
आजचा महिलांचा दिवस लक्षात घेऊन मंदिर समितीने महिलांच्या दर्शन आणि वाण वश्या साठी वेगळी व्यवस्था केली आहे . या महिला देवाला आपल्या सोबत आणलेले वाण अर्पण केल्यानंतर एकमेकींना हळदीकुंकू लावून वाण देत आहेत .
यासाठी राज्यातील महिला या भाविकांसोबत कर्नाटक, आंध्र प्रदेशातील भाविक मोठ्या श्रद्धेने पंढरीत दाखल झाले आहेत.
यासाठी राज्यातील महिला या भाविकांसोबत कर्नाटक, आंध्र प्रदेशातील भाविक मोठ्या श्रद्धेने पंढरीत दाखल झाले आहेत.