Ganesh Chaturthi 2022 : अमरावतीत देश-विदेशातील तब्बल 400 हून अधिक गणेश मूर्ती एकाच घरी विराजमान
घरोघरी लाडक्या बाप्पाचं आगम झालं आहे. गणेशोत्सवा निमित्ताने सगळीकडे आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअसाच गणेशोत्सवाचा उत्साह अमरावतीतही पाहायला मिळाला. अमरावतीततील खंडेलवाल कुटुंबियांनी एक नाही दोन नाही तर तब्बल 400 गणेश मूर्ती घरी विराजमान केल्या आहेत.
अमरावतीत राहणारे खंडेलवाल कुटुंब गेल्या 25-30 वर्षांपासून बाप्पांची प्रतिष्ठापना करतात.
या मूर्तींचं वैशिष्ट्य म्हणजे या मूर्ती मराठवाड्यापासून ते अगदी कन्याकुमारीपर्यंत देश-विदेशातील प्रत्येक प्रांतातून आणल्या आहेत.
सुरुवातीला 11 मूर्तींपासून विविध गणेश मूर्ती स्थापना करण्याची परंपरा खंडेलवाल कुटुंबियांनी केली होती. मात्र, आता हा संग्रहित मूर्तींचा आकडा 400 हून अधिक झाला आहे.
विशेष म्हणजे, गणपती सजावटीसाठी तयार करण्यात आलेला देखावा हा टाकाऊ वस्तूंपासून बनविण्यात आला आहे.
काही मूर्ती दगडावर आहेत, काही मार्बलवर तर काही वेगवेगळ्या धान्यांपासून घरी तयार केलेल्या मूर्ती या ठिकाणी पाहायला मिळतात.
देश-विदेशातील या विविध गणेश मूर्ती सध्या सगळ्यांच्याच आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतायत.