Amravati News: कला शिक्षकाने खडूने रेखाटले अप्रतिम चित्र; प्रजासत्ताक दिनाच्या दिल्या कलेतून शुभेच्छा
स्वतंत्र भारताचा 75 वा प्रजासत्ताक दिन (Republic Day 2024) आज सर्वत्र मोठ्या हर्ष-उल्हासात साजरा होत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appभारत देशाने संविधानाचा स्वीकार करून लोकशाहीतील एका नव्या पर्वाची सुरुवात केली, तो दिवस म्हणजे 26 जानेवारी.
भारतीय संविधानाची अंमलबजावणी 26 जानेवारी 1950 रोजी झाली.
त्यानंतर भारत एक प्रजासत्ताक देश बनला.
म्हणूनच आपण हा दिवस देशाचा प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो.
या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे येथील कला शिक्षक अजय जीरापुरे यांनी फलकावर खडूच्या साह्याने चित्र रेखाटन करून सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य मिळाले. परंतु 26 जानेवारी 1950 रोजी भारताला सार्वभौम लोकशाही प्रजासत्ताक (Republic Day ) घोषित करण्यात आले.
या दिनानिमित्त देशभर उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे.
याच 75 वा प्रजासत्ताक दिना निमित्य अजय जीरापुरे यांनी फलकावर खडूच्या साह्याने हे अप्रतिम चित्र रेखाटले आहे.
त्यांच्या या अप्रतिम कलेचे सर्वत्र कौतुक होत आहे.