fake cumin rice : तुम्ही जीरा राईस खात असाल तर सावधान; तुम्ही खाता ते जिरे बनावट तर नाही ना?
शहरात बनावट जिरे विक्री करण्यासाठी आलेल्या टेम्पोवर शांतीनगर पोलिसांनी धाड टाकून ७ लाख १९ हजार ७०० रुपये किमतीचा २३९९ किलो बनावट जिरे शांतीनगर पोलिसांनी जप्त केले आहे.(फोटो क्रेडिट : प्रतिनिधी अनिल वर्मा)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया प्रकरणी दोन जणांना अटक केले असल्याची माहिती भिवंडी पोलीस उपायुक्त नवनाथ ढवळे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे.शादाब इस्लाम खान वय ३३ वर्ष (फोटो क्रेडिट : प्रतिनिधी अनिल वर्मा)
नवलीफाटा पालघर व चेतन रमेशभाई गांधी वय ३४ वर्ष रा. कांदिवली पश्चिम असे बनावट जिरे प्रकरणी अटक केलेल्या दोघा आरोपींची नावे आहेत.(फोटो क्रेडिट : प्रतिनिधी अनिल वर्मा)
तुम्ही जीरा राईस खात असाल तर सावधान कारण बाजारात बनावट जिऱ्याचा वापर होत असल्याचं समोर आलं आहे. बाजार भावापेक्षा अर्ध्या किमतीत बनावट जिरा बाजारात उपलब्ध आहे. (फोटो क्रेडिट : प्रतिनिधी अनिल वर्मा)
अनेक जण जिऱ्याचा वापर वेट लॉस करण्यासाठी तर खाद्यपदार्थांमध्ये केला जातो परंतु केमिकल चा वापर करून बनावट जीरा तयार केल्याने आरोग्यास मोठा धोका ठरणारा हा केमिकल युक्त बनावट जीरा असल्यानं पोलिसांनी कारवाई करत बनावट जीरा च्या कंपनीला टाळा ठोकला आहे.(फोटो क्रेडिट : प्रतिनिधी अनिल वर्मा)
पाण्यामध्ये बनावट जीरा टाकला असता तो गढूळ रंगाचा मळकट पाण्यासारखा दिसतो तर खरा जिरा पाण्यात टाकला असता स्वच्छ पिवळसर रंगाचा दिसतो. (फोटो क्रेडिट : प्रतिनिधी अनिल वर्मा)
त्यामुळे बाजारात मोठ्या प्रमाणात बनावट जीरा असल्याने जर तुम्ही जिरा खरेदी करत असाल तर अशा पद्धतीने बनावट जीरा ओळखू शकता.(फोटो क्रेडिट : प्रतिनिधी अनिल वर्मा)
शांतीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ९० फूट रोड, नागाव फातमा नगर येथे बनावट जिरे येणार असल्याची गुप्त माहिती पोलीस उपनिरीक्षक एस एम घुगे व पोलीस शिपाई क्षीरसागर यांना मिळाली होती. (फोटो क्रेडिट : प्रतिनिधी अनिल वर्मा)
शांतीनगर पोलिसांनी भिवंडी पोलीस उपायुक्त नवनाथ ढवळे, सहाय्यक पोलीस आयुक्त किशोर खैरनार व वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर इंदलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तयार करून नागाव फातमानगर येथे सापळा लावला. (फोटो क्रेडिट : प्रतिनिधी अनिल वर्मा)
या ठिकाणी पिकअप टेम्पोत बनावट जीरा आढळला पोलिसांनी टेम्पोतून आणलेल्या ८० गोन्यांमधील ७ लाख १९ हजार ७०० रुपये किंमतीचा मधून सुमारे साडेतीन टन बनावट जिरे माल व ४ लाख रुपये किंमतीचा टेम्पो असा सुमारे ११ लाखांचा मुद्देमाल शांतीनगर पोलिसांनी जप्त केला आहे. (फोटो क्रेडिट : प्रतिनिधी अनिल वर्मा)