Amravati News: 55 किलो चॉकलेट पासून तयार केली राममंदिराची प्रतिकृति; अमरावतीत बघ्यांची एकच गर्दी
ज्या क्षणाची अवघ्या देशाला प्रतीक्षा होती, तो क्षण अवघ्या काही तासावर येऊन ठेपलाय.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसोमवार 22 जानेवारीला अयोध्येत राम मंदिरात (Ram Temple) प्रभू श्री रामांचा प्राणप्रतिष्ठा (Pran Pratishtha) सोहळा संपन्न होणार आहे.
या सोहळ्याच्या निमित्याने अयोध्यानगरीसह संपूर्ण देश सज्ज झाला आहे.
प्रत्येक रामभक्त आपआपल्या पद्धतीने प्रभूश्री राम चरणी आपली सेवा रुजू करतोय .
त्या पार्श्वभूमीवर अमरावती येथील प्रसिद्ध असलेली रघुवीर स्वीट मार्टचे संचालक प्रियेश पोपट यांनी आपल्या स्वीट मार्टवर आज तब्बल 55 किलो असलेला राममंदिरचा चॉकलेट केक बनवला.
या चॉकलेट केक मंदिराला तब्बल 6 कारागिरांनी चार दिवसात बनविले आहे.
या चॉकलेटचं राम मंदिर पाहण्यासाठी अमरावतीकरांनी एकच गर्दी केली आहे.
हा चॉकलेटचं राम मंदिर तयार करण्यासाठी प्रचंड मेहनत प्रियेश पोपट यांनी घेतली आहे.
अयोध्येत राम मंदिरात प्रभू श्री रामांचा प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न होणार आहे.
मी तिथे जाऊ शकलो नाही तरी मी माझ्या कलेटतून रामलला चरणी वंदन करत असल्याचे ते म्हणाले