manicure and pedicure : पुरुषांनी सुद्धा मॅनिक्युअर आणि पेडीक्योर का करावं? जाणून घ्या!
अनेकदा स्त्रिया मॅनिक्युअर आणि पेडीक्योरच्या मदतीने त्यांच्या त्वचेची काळजी घेतात. यामुळे आठवडाभरात किंवा महिन्यात त्वचेला होणारे नुकसान आटोक्यात आणण्यास मदत होते, परंतु पुरुष असे करत नाहीत. [Photo Credit : Pexel.com]
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपुरुषांचेही हात खराब होतात , टॅनिंग होते. अशा स्थितीत पुरुषांनीही वेळ काढून हात-पायांकडे लक्ष द्यावे आणि वेळोवेळी मॅनिक्युअर आणि पेडीक्योर करून घ्यावे. कारण ते फक्त एकच नाही तर अनेक फायदे देतात. [Photo Credit : Pexel.com]
पुरुषांसाठी मॅनिक्युअर आणि पेडीक्योर आवश्यक का आहे ? पुरुषांचे हात पाय महिलांसारखे चांगले दिसत नाहीत हे तुमच्या अनेकदा लक्षात आले असेल. यामुळे पुरुषांनी देखील मॅनिक्युअर आणि पेडीक्योर करणं आवश्यक आहे. [Photo Credit : Pexel.com]
याच्या मदतीने बोटे, पायाची बोटे यामध्ये साचलेली घाण काढता येते. हात आणि पायांमध्ये बॅक्टेरियामुळे संसर्ग होण्याचा धोकाही कमी होतो. [Photo Credit : Pexel.com]
मॅनिक्युअर आणि पेडीक्योर केल्याने हात आणि पायांची नखे सुंदर दिसतात. हँडशेक करताना तुमचे हात सुंदर दिसतात, ते तुमच्या समोरच्या व्यक्तीवर चांगली छाप पाडते. [Photo Credit : Pexel.com]
तुमचे व्यक्तिमत्वही वाढवते कारण कधी कधी तुमचा चेहरा चमकत असेल पण हाताच्या नखांमध्ये साचलेली घाण छाप खराब करू शकते. अशा परिस्थितीत तुम्ही घरीच मॅनिक्युअर करू शकता. [Photo Credit : Pexel.com]
मॅनिक्युअर केल्याने रक्ताभिसरण वाढते आणि हात दुखणे कमी होते, विशेषत: जे लोक संगणक आणि मोबाईलवर काम करत असतात त्यांच्यासाठी. [Photo Credit : Pexel.com]
पुरुषांना ऑफिसमध्ये अनेकदा बूट घालावे लागतात. अशा परिस्थितीत, बहुतेक लोकांच्या पायाला दुर्गंधी येऊ लागते. [Photo Credit : Pexel.com]
जास्त वेळ शूज घातल्याने बॅक्टेरिया वाढण्याची शक्यता असते. पेडीक्युअर केले तर पायाला येणारा दुर्गंधी कमी करता येतो आणि स्वच्छताही राखता येते. [Photo Credit : Pexel.com]
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.[Photo Credit : Pexel.com]