green and red chilies : हिरवी की लाल; कोणती मिरची जेवणात वापरावी?
मिरचीचा वापर जेवणात खूप होतो. तुम्ही तयार केलेल्या कोणत्याही पदार्थाला मिरची घातल्याशिवाय चव येत नाही. मिरचीमध्ये असलेले कॅप्सेसिन नावाचे संयुग अन्नाला तिखट आणि मसालेदार बनवते. [Photo Credit : Pexel.com]
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमिरची चे अन्न चविष्ट वाटते. भाज्या, डाळी किंवा कोणताही मांसाहारी पदार्थ असो, प्रत्येक डिश स्वादिष्ट बनवण्यासाठी मिरचीचा वापर केला जातो. [Photo Credit : Pexel.com]
पण तुम्ही कधी विचार केला आहे का की जेवणात वापरण्यात येणाऱ्या हिरव्या आणि लाल मिरच्या या दोनपैकी कोणती मिरची जास्त फायदेशीर आहे? आज येथे जाणून घ्या कोणती मिरची आरोग्यासाठी चांगली असते . [Photo Credit : Pexel.com]
मिरची का फायदेशीर आहे ?मिरचीमध्ये अँटीऑक्सिडंट आणि इतर पोषक घटक मुबलक प्रमाणात आढळतात. पण मिरचीचे नियमित सेवन आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. [Photo Credit : Pexel.com][Photo Credit : Pexel.com]
हिरव्या मिरचीमध्ये कॅप्सेसिनचे प्रमाण लाल मिरचीपेक्षा कमी असते, ज्यामुळे ती पचनसंस्थेसाठी अधिक उपयुक्त ठरते. [Photo Credit : Pexel.com]
हिरव्या मिरचीमध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, पोटॅशियम, कॅल्शियम आणि लोह सारखे पोषक घटक मोठ्या प्रमाणात आढळतात. [Photo Credit : Pexel.com]
हिरव्या मिरचीमध्ये अँटिऑक्सिडंट गुणधर्म आढळतात जे पेशींना नुकसान होण्यापासून वाचवतात. हिरवी मिरचीचे नियमित सेवन केल्यास रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि आरोग्य सुधारते. त्यामुळे लाल मिरचीपेक्षा हिरव्या मिरचीचे सेवन अधिक सुरक्षित मानले जाते. [Photo Credit : Pexel.com]
हिरव्या मिरचीचे सेवन पचनसंस्थेसाठी खूप फायदेशीर आहे. हिरव्या मिरचीमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते जे पोटाच्या समस्या दूर करण्यास मदत करते, बद्धकोष्ठता दूर होते. तसेच हिरव्या मिरचीमध्ये असलेले एन्झाइम अन्न पचण्यास मदत करतात. [Photo Credit : Pexel.com]
हिरव्या मिरचीमध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म देखील असतात जे पोटात जळजळ आणि संसर्ग टाळतात. त्यामुळे हिरवी मिरचीचे नियमित सेवन केल्याने पचनक्रिया चांगली राहते. [Photo Credit : Pexel.com]
हिरव्या मिरचीमध्ये असलेले अँटिऑक्सिडंट गुणधर्म रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. [Photo Credit : Pexel.com]
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत. [Photo Credit : Pexel.com]