अमरावतीत दिव्यांग बांधवांनी दाखवला जोर; महाराष्ट्र श्री शरीरसौष्ठव स्पर्धा संपन्न
प्रणय निर्बाण, एबीपी माझा
Updated at:
02 Dec 2023 11:51 PM (IST)

1
शरीरसौष्ठवचे वेड अनेकांना असते. मात्र, फार कमी लोक यात यशस्वी होतात.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
2
शरीरसौष्ठव स्पर्धेसाठी तुमच्या मनात जिद्द आणि प्रतिबद्धता, गांभीर्य असणे आवश्यक असते.

3
नेमकं हेच सांगण्याचा प्रयत्न दिव्यांग शरीरसौष्ठव स्पर्धकांनी केला.
4
जागतिक दिव्यांग दिनाच्या पूर्वसंध्येला अमरावतीमध्ये दिव्यांग महाराष्ट्र श्री शरीरसौष्ठव राज्यस्तरीय स्पर्धा आयोजित करण्यात आली.
5
या स्पर्धेत दिव्यांग खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवला होता.
6
या स्पर्धेत सहभागी खेळाडूंनी विविध पोजेस सादर करून आपण कुणापेक्षा कमी नसल्याचे दाखवून दिले.
7
अमरावती जिल्हा पॅराऑलिम्पिक असोसिएशन आणि अमरावती महानगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
8
या स्पर्धेत सहभागी झालेल्या स्पर्धेकांचे सगळीकडे कौतुक होत आहे.