Money Deadlines in Dec 2023: 31 डिसेंबरपर्यंत 'ही' करा कामे पूर्ण, अन्यथा तुमच्या खिशावर थेट परिणाम!
RBI ने जानेवारी 2023 मध्ये ग्राहकांना लॉकर करारावर टप्प्याटप्प्याने स्वाक्षरी करण्यास सांगितले होते. अशा परिस्थितीत, नवीन लॉकर करारावर स्वाक्षरी करण्याची अंतिम मुदत 31 डिसेंबर 2023 रोजी संपत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआधार कार्ड मोफत अपडेट करण्याची अंतिम मुदत 14 डिसेंबर रोजी संपत आहे. तुमचा आधार तयार होऊन 10 वर्षे किंवा त्याहून अधिक काळ झाला असेल, तर तुम्ही 14 डिसेंबरपर्यंत पत्त्यापासून बायोमेट्रिक्सपर्यंत कोणतीही माहिती ऑनलाइन मोफत अपडेट करू शकता.
म्युच्युअल फंड, डिमॅट खातेधारकांनी 31 डिसेंबर 2023 पर्यंत नामांकन प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. तसे न केल्यास, तुमचा पोर्टफोलिओ गोठवला जाईल आणि तुम्ही नामांकन केल्यानंतरच तो पुन्हा ऑपरेट करू शकाल.
आर्थिक वर्ष 2022-23 साठी दंडासह आयकर विवरणपत्र भरण्याची अंतिम मुदत 31 डिसेंबर रोजी संपत आहे. ज्या लोकांचे वार्षिक उत्पन्न 5 लाख रुपयांपेक्षा कमी आहे ते 1000 रुपये दंड भरून ITR दाखल करू शकतात. तर 5 लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्यांना 5,000 रुपये दंड भरावा लागेल.
जर तुम्हाला SBI च्या अमृत कलश योजनेत गुंतवणूक करायची असेल तर तुम्हाला 31 डिसेंबरपर्यंत संधी आहे. या योजनेअंतर्गत 400 दिवसांच्या FD योजनेवर 7.10 टक्के व्याजदराचा लाभ मिळतो.
तुम्ही 31 डिसेंबरपर्यंत 375 ते 444 दिवसांच्या IDBI च्या विशेष FD स्कीम 'अमृत महोत्सव FD' मध्ये देखील गुंतवणूक करू शकता. या योजनेंतर्गत सर्वसामान्यांना 6.80 टक्के तर ज्येष्ठ नागरिकांना 7.30 टक्के व्याजदराचा लाभ मिळत आहे.
तुम्हाला SBI च्या विशेष सणासुदीच्या होम लोन ऑफरचा लाभ घ्यायचा असेल, तर तुमच्याकडे 31 डिसेंबरपर्यंत वेळ आहे. या योजनेंतर्गत ग्राहकांना गृहकर्जावर 65 बेसिस पॉइंट्सची सूट मिळत आहे.