दुधाच्या दरात घसरण, शेतकरी चिंतेत
महाराष्ट्र (Maharashtra) राज्यात दूध व्यवसाय (Milk business) हा शेतकऱ्यांसाठी (Farmers) एक प्रमुख जोडधंडा आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआपलं राज्य देशात दूध उत्पादनात अग्रभागी आहे. मोठ्या प्रमाणात दुधाचं संकलन राज्यात होतं.
ग्रामीण अर्थव्यवस्थेचा (Rural Economy) महत्वाचा भाग म्हणून दूध व्यवसायाकडं बघितलं जातं. पण सध्याच्या काळात राज्यातील दूध उत्पादक शेतकरी अडचणीत सापडल्याचं चित्र दिसत आहे.
एकीकडं दिवसें दिवस दूध उत्पादनाचा खर्च वाढ आहे तर दुसरीकडं दुधाचे दर ( Milk Price) कमी होतायेत.
राज्यात संघटीत क्षेत्रात 1 कोटी 30 लाख लिटर दुध संकलित होते. पैकी 90 लाख लिटर दुध पाऊच पॅकद्वारे घरगुती गरज भागवण्यासाठी रोज खर्च होते.
महाराष्ट्रात ही गरज भागवून साधारणपणे 40 लाख लिटर दुधाची पावडर आणि बटर बनते. घरगुती गरजेपेक्षा 40 लाख लिटर दुध महाराष्ट्रात अतिरिक्त (सरप्लस) निर्माण होते.
सध्या राज्यातील दूध उत्पादक शेतकरी अडचणीत सापडल्याचे चित्र दिसत आहे. कारण दुधाचे दर सातत्यानं कमी होत आहे. याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसत आहे.
दुध क्षेत्रात किमान स्थिरता नसल्याने महाराष्ट्रात दुध क्षेत्राच्या प्रगतीला मोठी बाधा निर्माण झाल्याचे अजित नवले म्हणाले. दुधाचे खरेदी आणि विक्रीचे दर किमान एका पातळीवर स्थिर झाल्यास गुंतवणुकीसाठी किमान पोषक वातावरण निर्माण होते. तरल दुध विक्रीबाबत अशी किमान स्थिरता पाऊच पॅक दुधाबाबत निर्माण झाली आहे.