Ajit Pawar: पार्थ आणि गुंड गजा मारणेची भेट अतिशय चुकीचं : दादा
सुपुत्र पार्थ पवारांच्या एका भेटीमुळे वाद निर्माण झाला आहे. (फोटो : प्रतिनिधी, एबीपी माझा, पुणे)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appउपमुख्यमंत्री अजित पवारांचे चिरंजीव पार्थ पवारांनी गुंड गजा मारणेची भेट घेतली. ज्याचे फोटो सध्या चांगलेच व्हायरल होत आहे. (फोटो : प्रतिनिधी, एबीपी माझा, पुणे)
या भेटीवर अनेक प्रश्न देखील उपस्थित झाले. अखेर आज अजित पवारांनी या संदर्भात मौन सोडले. (फोटो : प्रतिनिधी, एबीपी माझा, पुणे)
पार्थ पवार आणि गुंड गजा मारणेची भेट चुकीचं असल्याचे अजित पवार म्हणाले. (Photo : facebook/ParthPawarSpeaks)
अजित पवार म्हणाले, पार्थ पवार यांनी गुंड गजा मारणेची जी भेट घेतली आहे ते अतिशय चुकीचे झाले आहे. पार्थ ज्या घरी गेला होता त्याठिकाणी गजा मारणे आला होता. माझ्या सोबत देखील असाच प्रकार घडला होता मात्र मी आता या संदर्भात काळजी घेतो आणि पोलीसांना आधीच सांगून ठेवतो. (Photo : facebook/ParthPawarSpeaks)
जयश्री मारणे या मनसेकडून नगरसेविका राहिलेल्या आहेत. सध्या अजित पवार गटाकडून पुण्यातील विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेतला जात आहे. (Photo : facebook/ParthPawarSpeaks)
कोथरूड विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी पार्थ पवार, माजी नगरसेवक बंडू केमसे, माजी महापौर दत्ता धनकवडे, माजी नगरसेवक दीपक मानकर हे कोथरूडमधे आले असता त्यांनी जयश्री मारणेंच्या घरी भेट दिली. (Photo : facebook/ParthPawarSpeaks)
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार आणि गजा मारणेच्या घरी सदिच्छा भेट झाली. या भेटीचं निमित्त होतं ते विधानसभा मतदारसंघातील दौरा होते. (Photo : facebook/ParthPawarSpeaks)
पार्थ पवारांनी कोथरुड विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतला आणि त्याचवेळी त्यांनी मारेणेंच्या घरी भेट दिली . गजानन मारणे आणि पत्नी जयश्री मारणेंनी पुष्पगुच्छ देऊन पार्थ पवारांचं स्वागतही केलं. (Photo : facebook/ParthPawarSpeaks)