आज वर्षातील पहिली आमावस्या; शनिशिंगणापूर मंदिरात भाविकांची रांग
आज शनिवार आणि वर्षातील पहिली अमावस्या आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशनिवारी अमावस्या आल्यामुळे या अमावस्याला शनिश्चर अमावस्या म्हटलं जातं.
पौष महिन्यातील शनिवारी येणाऱ्या अमावस्येचा योग विशेष मानला जातो.
विशेष म्हणजे 20 वर्षांनंतर हा शुभ योग आला आहे.
वर्षाच्या सुरुवातीलाच अमावस्या आल्याने लाखोंच्या संख्येनं भाविकांनी अहमदनगरमधील शनीशिंगणापूर मंदिरात दर्शनासाठी गर्दी केली आहे.
दुपारी 12 वाजता शनी देवाची आरती करण्यात आली.
शनिशिंगणापूर देवस्थानच्यावतीने भाविकांसाठी मोफत आरोग्य सेवाही उपलब्ध करण्यात आली आहे.
शनी अमावस्यानिमित्ताने लाखोंच्या संख्येने भाविक शनिशिंगणापुरात दाखल झाले आहेत.
भाविकांची गर्दी लक्षात घेता दोन शिफ्टमध्ये आरोग्य कर्मचारी याठिकाणी सेवा देणार आहेत.
सोबतच शनिशिंगणापूर येथील बर्फीचा प्रसाद घेण्यासाठी भाविकांची गर्दी पाहायला मिळत आहे.
त्यासाठी देवस्थानच्या वतीने स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे.
दिवसभरात किमान दहा लाख भाविक दर्शनासाठी येतील असा अंदाज देवस्थान ट्रस्टने व्यक्त केला आहे.