SSR Birth Anniversary : छोट्या पडद्यापासून सुरुवात; 'एम एस धोनी'पासून 'केदारनाथ'पर्यंत, असा होता सुशांत सिंह राजपूतचा प्रवास
दिवंगत बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत हा सगळ्यांचा लाडका होता. सुशांतच्या 37व्या वाढदिवसानिमित्त त्याच्या दमदार प्रवासावर एक नजर...
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदिग्दर्शक नितीश कुमार दिग्दर्शित 'छिछोरे' या चित्रपटाचाही समावेश सुशांतच्या हिट चित्रपटांच्या यादीत आहे.
छोट्या पडद्यावरील पवित्र रिश्ता या मालिकेमुळे त्याला खरी ओळख मिळाली. 'मानव' या भूमिकेमुळे सुशांतचं नाव घराघरात पोहोचलं.
यानंतर सुशांत सिंह राजपूत 'शुद्ध देसी रोमान्स' या चित्रपटात अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि वाणी कपूरसोबत दिसला होता.
सुशांत सिंह राजपूतने आपल्या अभिनयाने चाहत्यांची मनं जिंकली.
सुशांतच्या मृत्यूनंतर त्याचा शेवटचा चित्रपट 'दिल बेचारा' OTT प्लॅटफॉर्म डिस्नी प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित झाला.
2016 हे वर्ष सुशांत सिंह राजपूतसाठी टर्निंग पॉइंट ठरले. टीम इंडियाचा माजी कप्तान महेंद्र सिंह धोनीच्या बायोपिक 'एमएस धोनी- द अनटोल्ड स्टोरी'मधला सुशांतचा अभिनय सर्वांनाच आवडला. हा चित्रपट सुपरहिट ठरला आणि सुशांत सिंग राजपूत रातोरात सुपरस्टार झाला. (PC : wallpaperflare)
2018 साली आलेला सुशांत सिंह राजपूतचा 'केदारनाथ' हा चित्रपट त्याच्या करिअरमधील सर्वोत्तम चित्रपटांपैकी एक मानला जातो.
अभिनेता सुशांत सिंह राजपूतने आपल्या अभिनयाने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं आहे. सुशांत आज या जगात नसला तरी चाहत्यांच्या मनात त्याच्या आठवणी कायम आहेत. (PC : wallpaperflare)