Bhandardara Dam : सलग सुट्ट्या आणि पर्यटनाचा आनंद, भंडारदरामध्ये पर्यटकांची रेलचेल
हिरवाईने नटलेला परिसर, धरणाचे ओसंडून वाहणार पाणी हे दृश्य पाहण्यासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appत्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा या परिसरात दिसून येत आहेत.
अहमदनगर जिल्ह्यात यावर्षी अद्यापही समाधानकारक पाऊस पडलेला नाही मात्र धरणाच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस बरसला आहे.
त्यामुळे उत्तर नगर जिल्ह्यासाठी वरदान ठरलेल भंडारदरा धरणाचा पाणीसाठा 98 टक्के झाला आहे.
रंधा फॉल, नेकलेस फॉल, बाहुबली फॉल, रिव्हर्स फॉल, सांदण दरी, घाटघरचा कोकणकडा ही भंडारदरा परिसरात प्रेक्षणीय ठिकाणं आहेत.
पर्यटक निसर्गाच्या सानिध्यात फिरताना बोटिंगचा देखील आनंद घेत आहेत.
तसेच भंडारदरा धरण तांत्रिकदृष्ट्या ओव्हरफ्लो झाले आहे.
धरण परिसरासह अनेक पर्यटन स्थळी सध्या पर्यटक भेट देत आहे.
तसेच सध्या भंडारदरामधील अनेक पर्यटनस्थळी पर्यटकांची रेलचेल पाहायला मिळत आहे.