Solapur : सोलापुरात शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न
सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात (Solapur Collector Office) स्वातंत्र्य दिनाचा सोहळा सुरु असतानाच एका शेतकऱ्याने (Farmer) आत्मदहनाचा प्रयत्न केला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपोलिसांनी वेळीच सावध होत शेतकऱ्याला ताब्यात घेतले अन्यथा मोठी घटना घडली असती.
दक्षिण सोलापूर तालुक्यातील दोड्डी येथील रहिवासी ज्ञानेश्वर भारत पाटील असे आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे.
लोकमंगल सहकारी बँकेकडून घेतलेले कर्ज परतफेड करुन देखील सातबारावरील बोजा न उतरवल्याने शेतकऱ्याने आत्मदहनाचा प्रयत्न केला.
जिल्हाधिकारी कार्यालयात एकीकडे ध्वजारोहण झाले. त्यानंतर वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांचे भाषण सुरू होते. त्याचवेळेस ज्ञानेश्वर पाटील यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला.
ज्ञानेश्वर पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर स्वतःवर डिझेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला.
प्रवेशद्वारावर सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्याला रोखत ताब्यात घेतलं.
स्वातंत्र्य दिनाचा सोहळा सुरु असतानाच एका शेतकऱ्याने (Farmer) आत्मदहनाचा प्रयत्न केला.
आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्यांना पोलिसांनी वेळीच घेतलं ताब्यात.