Guru Purnima 2024 : साईनगरी भक्तांनी गजबजली! आजपासून तीन दिवसीय गुरुपौर्णिमा उत्सवाला सुरुवात, भक्तांसाठी साईमंदिर रात्रभर राहणार खुलं
दरवर्षीप्रमाणे गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त साईनगरी शिर्डी भक्तांनी गजबजली आहे. या निमित्ताने आजपासून तीन दिवसीय उत्सवाला सुरुवात झाली आहे. आज गुरुपौर्णिमा निमित्त शिर्डीत साईबाबांच्या गुरुपौर्णिमा उत्सवाला सुरुवात झाली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसाईबाबा संस्थानच्या तीन दिवसीय गुरुपौर्णिमा उत्सवास आज पहाटे प्रारंभ झाला असून पहाटे काकड आरती मंगलस्थानानंतर साई चरित्राची ग्रंथ मिरवणूक काढून या उत्सवाला सुरुवात झाली.
साई भक्तांच्या सेवेसाठी साई संस्थान सज्ज झालं असून मोठा पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला आहे.
आज उत्सवाचा पहिला दिवस असून साईसच्चरित ग्रंथाच्या मिरवणुकीत संस्थांनचे अध्यक्ष सुधाकर येरलगड्डा, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ आणि आणि संस्थांनचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्षक गाडीलकर सहभागी झाले होते.
उद्या उत्सवाचा मुख्य दिवस असून भक्तांसाठी साईमंदिर रात्रभर दर्शनासाठी खुले ठेवण्यात येणार आहे.
गुरु पौर्णिमा उत्सवानिमित्त राज्यभरातून अनेक पायी पालखी देखील आता शिर्डीत पोहोचायला सुरुवात झाली आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदाही हा उत्सव मोठ्या आनंदात आणि उत्साहा साजरा करण्यात येणार आहे.