अभिनेते क्रिशन कुमार यांच्या मुलीची कर्करोगासोबतची झुंज अपयशी, सिनेसृष्टीत हळहळ!

नव्वदीच्या दशकात काही चित्रपटांमध्ये झळकलेले अभिनेते आणि टी-सीरिज या कंपनीने सह-मालक क्रिशन कुमार (Krishan Kumar) यांची मुलगी तीशा कुमार (Tishaa Kumar) हिचे निधन झाले आहे.ती अवघ्या 21 वर्षाची होती.

अवघ्या 21 व्या वर्षी तीशा कुमारचे निधन झाले.

1/6
नव्वदीच्या दशकात काही चित्रपटांमध्ये झळकलेले अभिनेते आणि टी-सीरिज या कंपनीने सह-मालक क्रिशन कुमार (Krishan Kumar) यांची मुलगी तीशा कुमार (Tishaa Kumar) हिचे निधन झाले आहे.ती अवघ्या 21 वर्षाची होती.
2/6
कॅन्सरसोबत सुरू असलेली तिची झुंज अपयशी ठरली.तीशा कुमारच्या निधनाने सिनेसृष्टीत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.तीशा कुमार हिच्यावर जर्मनीत उपचार सुरू होते. मात्र,उपचारादरम्यान तिची प्राणज्योत मालवली.
3/6
तीशा कुमार ही सिनेजगताच्या ग्लॅमरस झगमगाटापासून दूर होती.अॅनिमल या चित्रपटाच्या एका पार्टीत तिने वडील क्रिशन कुमार यांच्यासोबत दिसली होती.त्यावेळी तिने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले होते.
4/6
काही महिन्यांपूर्वी तीशा कुमारला कर्करोगाचे निदान झाले होते.त्यानंतर तिच्यावर उपचार सुरू करण्यात आले.तीशाला पुढील उपचारासाठी जर्मनीतील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
5/6
त्यानंतर गुरुवारी रात्री उशिरा रुग्णालयात उपचारा दरम्यान तिची प्राणज्योत मालवली. तीशाची कर्करोगासोबतची झुंज अपयशी ठरल्याने सगळीकडे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
6/6
तीशा कुमार हीचा जन्म 6 सप्टेंबर2003 रोजी झाला होता.तीशा कुमारचं शिक्षण राजस्थानमधील जोधपूर येथे झालं होतं.
Sponsored Links by Taboola