मालाड, भिवंडी ते अंधेरीपर्यंत कोसळधारा, मुंबईतील मुसळधार पावसाचा 'आँखो देखा हाल' सांगणारे 10 फोटो!
सध्या मुंबईत अनेक ठिकाणी पाऊस बरसतोय. या पावसामुळे वेगवेगळ्या ठिकाणी पाणी साचले आहे. पाणी साचल्यामुळे अनेक रस्ते बंद करण्यात आले आहेत.
mumbai rain updates (फोटो सौजन्य- एबीपी माझा प्रतिनिधी)
1/10
मुंबईमध्ये जोरदार पाऊस कोसळतोय. या पावसामुळे रेल्वे तसेच रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे.
2/10
पूर्व उपनगरात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे सकल भागात पाणी साचले आहे.
3/10
नाहूर येथील व्हिलेज रोड परिसरात देखील अशाच प्रकारे पाणी साचले आहे. त्यामुळे बेस्ट बसेस आणि खासगी वाहनांना याच पाण्यातून वाट काढत पुढे जावे लागत आहे.
4/10
मुंबईमध्ये रात्रभरापासून संततधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे मुंबईच्या काही सकल भागात पाणी साचायला सुरुवात झालेली आहे.
5/10
सायन परिसरातही काही प्रमाणात पाणी भरलेलं पाहायला मिळतंय. मात्र अद्याप वाहतूक कोंडी झालेली नाही.पावसाचा जोर कायम राहिला तर मात्र वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे.
6/10
भिवंडी शहरात सकाळपासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे भिवंडी शहरातील अनेक सकल भागामध्ये पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे.
7/10
भिवंडी शहरातील भाजी मार्केट तीनबत्ती परिसरात गुडघाभर पाणी साचले आहे. भाजी मार्केटमध्ये अचानक आलेल्या पाण्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली.
8/10
पहाटेपासून सुरू असलेल्या पावसामुळे मुंबई पश्चिम उपनगरातील मालाड सबवे पाणी खाली गेला आहे. मालाड सबवेमध्ये अडीच ते तीन फूट पाणी भरल्यामुळे हा सबवे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.
9/10
मुंबईत पहाटेपासून मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे समुद्रकिनाऱ्यावर न जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
10/10
पावसाचा मुंबई लोकलवरही परिणाम झाला आहे. मध्य आणि हार्बर रेल्वे 10 ते 15 मिनिटे उशिराने धावत आहेत. तर पश्चिम रेल्वे मार्गावरही लोकल उशिराने धावत आहेत.
Published at : 20 Jul 2024 09:23 AM (IST)