Anna Hazare : अण्णा हजारेंकडून राळेगणसिद्धीत लाकडी घाण्यातून तेल निर्मितीचा प्रकल्प सुरु
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी जलसंधारण, भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलनासोबतच आता नागरिकांच्या सुदृढ जीवनासाठी राळेगणसिद्धीत एक नवा प्रकल्प सुरु केला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appतो म्हणजे लाकडी घाण्यातून विविध प्रकारच्या तेल निर्मितीचा. विशेष म्हणजे ना नफा ना तोटा या तत्वावर अण्णा हे तेल नागरिकांना देतात.
सध्या खाद्य तेलामध्ये सुरु असलेल्या भेसळीमुळे अनेक आजार बळावले आहेत. त्यातल्या त्यात अतिशय तरुण युवकांनाही हृदयविकाराचे झटका येऊन त्यात त्यांना जीव गमवावा लागत आहेत.
इतरही खाद्य पदार्थांमध्ये भेसळ होत आहे. ही गोष्ट लक्षात घेऊन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी राळेगणसिद्धीत लाकडी घाण्यावर तेल निर्मिती प्रकल्प सुरु केला आहे.
सध्या इथे सूर्यफूल, करडई, शेंगदाणे आणि नारळाचे तेल काढले जात आहे, भविष्यात 70 प्रकारच्या वेगवेगळ्या पदार्थांपासून तेल निर्मिती करण्याचा या अण्णांचा मानस आहे.
तसेच मिरची पावडर, हळद पावडर, जिरे पावडर आणि विविध प्रकारचे मसाले देखील या प्रकल्पात तयार होणार आहेत.
या प्रकल्पाला 24 लाख रुपयांचा खर्च आला आहे, तो अण्णानी त्यांना मिळालेल्या पुरस्काराच्या रक्कमेतून आणि पेन्शनमधून केला आहे.
हिंद सेवा ट्रस्टच्या माध्यमातून हा प्रकल्प चालवला जात आहे.
या प्रकल्पात सध्या दोन महिला, एक पुरुष काम करत आहेत. सकाळी नऊ वाजल्यापासून त्यांच्या कामाला सुरुवात होते.
दोन ते तीन दिवस तेल निवळण्यासाठी ठेवले जाते. नंतर त्याची पॅकिंग करुन विक्रीसाठी शोरुममध्ये ठेवले जाते. सध्या ना नफा ना तोटा या तत्वावर हे तेल विकलं जात आहे.