Photo: छत्रपती संभाजीनगर विभागातील 45 हजारांवर कर्मचारी संपावर
मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत कोणताही तोडगा निघाला नसल्याने राज्यभरातील तब्बल 18 लाख कर्मचारी संपावर गेल्याचे समोर आले आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजुन्या पेन्शनच्या मागणीसाठी सरकारी कर्मचाऱ्यांनी संपाची हाक दिली आहे.
याचवेळी छत्रपती संभाजीनगर विभागातील सरकारी कर्मचाऱ्यांनी देखील या संपाला पाठिंबा दिला आहे.
छत्रपती संभाजीनगर विभागातील 45 हजारांवर कर्मचारी संपावर गेल्याचा दावा करण्यात आला आहे.
नव्या पेन्शन योजनेत कर्मचाऱ्यांवर मोठ्या प्रमाणात अन्याय झाला असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
त्यामुळे जुनी पेन्शन योजना लागू करावी या प्रमुख मागणीसाठी राज्यातील निमशासकीय कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर गेले आहेत.
यात मराठवाड्यातील सुमारे 45 हजार राज्य कर्मचाऱ्यांचाही सहभाग आहे.
तर आपली मागणी पूर्ण होईपर्यंत हा लढा सुरू राहणार असल्याची माहिती संपकऱ्यांनी दिली आहे.
आरोग्य विभागातील कर्मचारी आणि अधिकारी यांचा देखील समावेश आहे.
दरम्यान छत्रपती संभाजीनगर शहरातील शासकीय घाटी रुग्णालयातील कर्मचारी देखील या संपात सहभागी झाले आहेत.
त्यामुळे आरोग्य यंत्रणा कोलमडणार असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.