एकेकाळी जगत होता खडतर आयुष्य, आज आहे कोट्यवधींचा मालक; जाणून घ्या दिग्दर्शक रोहित शेट्टीबद्दल
बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माता रोहित शेट्टीचा (Rohit Shetty) आज वाढदिवस आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appरोहित शेट्टीचा जन्म 14 मार्च 1974 मध्ये मुंबई येथे झाला.
रोहितची आई रत्ना शेट्टी या ज्युनियर आर्टिस्ट होत्या तर त्याचे वडील एमबी शेट्टी हे स्टंटमॅन होते.
गोलमाल, चेन्नई एक्सप्रेस, सिंघम आणि बोल बच्चन या रोहितनं दिग्दर्शित केलेल्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला.
रोहितने एका मुलाखतीमध्ये सांगितलं होतं की त्याला काही दिवस अर्थिक अडचणींचा सामना करावा लागला.
मुलाखतीमध्ये रोहित शेट्टीनं सांगितलं की, 'लोकांना वाटतं की मला खूप सोप्या पद्धतीनं बॉलिवूडमध्ये काम करायची संधी मिळाली. पण मी जेव्हा काम करायला सुरूवात केली तेव्हा माझी पहिली कमाई ही 35 रूपये होती. अनेक वेळा मला हा प्रश्न पडत होता की मी जेवण करू की ट्रॅव्हल करण्यासाठी हे पैसे वापरू, कधी मी जेवण न करता प्रवास करात होते तर कधी जेवण करुन चालत घरी जात होतो.'
एकेकाळी आर्थिक अडचणींना सामोरं जाणारा रोहित शेट्टी आता कोट्यवधींचा मालक आहे.
एका रिपोर्टनुसार, रोहित हा 280 कोटींच्या संपत्तीचा मालक आहे. त्याच्याकडे बीएमडब्ल्यू, रेंज रोव्हर यांसारख्या आलिशान गाड्या देखील आहेत.
रोहितची 'इंडियन पोलीस फोर्स' ही वेब सीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.