Ahmednagar Ganesh Visarjan : अहदनगरमध्ये गणेश विसर्जन मिरवणूक अंतिम टप्प्यात, घरगुती बाप्पाना भावपूर्ण निरोप, पहा फोटो
अहमदनगरचे ग्रामदैवत श्री विशाल गणपती मंदिरातील बाप्पाची विसर्जन मिरवणूक अंतिम टप्प्यावर आली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदरम्यान, अहमदनगरच्या तालयोगी प्रतिष्ठानच्या माध्यमातून दरवर्षी घरगुती गणपती विसर्जन केले जाते.
अहमदनगरचे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या हस्ते सपत्नीक विधिवत पूजा करून सकाळी गणेश विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ झाला.
ढोल पथकांच्या निनादात ही मिरवणूक शहरातील विसर्जन मिरवणुक मार्गाने काढण्यात आली.
बाप्पाच्या आगमनानंतर शहरासह जिल्ह्यात पावसाने हजेरी लावल्याने विघ्नहर्त्याने दुष्काळाचे विघ्न बाप्पाने दूर केल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.
यंदा दोन ढोल पथकांच्या निनादात मिरवणूक पार पडते आहे, यावेळी अबालवृद्धांसह चिमुरड्यांनी जड अंतःकरणाने लाडक्या बाप्पाला निरोप दिला.
या मिरवणुकीत शिवसूर्य मर्दानी, साज लेझीम आणि झांज पथक, हलगी पथक यांचा समावेश असतो. त्यामुळे प्रचंड उत्साह पहायला मिळतो.
सकाळपासून बाप्पाच्या मूर्तीचे संकलनास सुरवात झाल्यानंतर दुपारी 2 वाजेपर्यंत घरगुती गणपतीचे संकलन केले गेले.
जवळपास 500 बाप्पाच्या मूर्ती संकलन करून त्याची अहमदनगर शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली.