अहमदनगरच्या चांदबीबी महालावर पर्यटकांची गर्दी
शनिवारी-रविवार सलग सुट्ट्या असल्याने पर्यटकांची पावलं आपोआपच निसर्गाकडे वळतात...
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअहमदनगरच्या चांदबीबी महालावर पर्यटकांची गर्दी जमली आहे. सलग सुट्ट्या आल्यामुळे पर्यटकांची पावले इकडे वळली आहेत.
अहमदनगर जिल्ह्यात जरी दमदार पाऊस झाला नसला तरी रिमझिम पावसामुळे शहरापासूनच जवळ असलेल्या चांदबीबी महाल परिसरात निसर्गाने हिरवा शालू पांघरला आहे.
त्यामुळे या निसर्गाचा मनमुराद आनंद घेण्यासाठी शहरासह जिल्ह्यातील पर्यटकांनी गर्दी केलीये.
स्वातंत्र्यपूर्व काळात इंग्रज देखील या महाल परिसरात थंड हवेचे ठिकाण म्हणून पर्यटनासाठी यायचे असं जाणकार सांगतात.
शहरापासून सुमारे 15 किमी अंतरावर असलेल्या उंच डोंगरावरील या महाल परिसरात थंडगार गारव्याचा आनंद घेत मक्याचे भाजलेले कणीस, पेरू आणि वन भोजन करण्यासाठी शहरातील नागरिक देखील येत असतात.
कॉलेजमधील विद्यार्थी, अबाल-वृद्ध मोठ्या संख्येने येथे पर्यटनासाठी येत असतात.