कोल्हापूरच्या राधानगरी तालुक्यातील धामोडमध्ये चिखल महोत्सव; मुलं रंगली चिखलात!
कोल्हापूरच्या राधानगरी तालुक्यातील धामोडमध्ये चिखल महोत्सव साजरा केला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appतंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थी मोबाईल, लॅपटॉपच्या दुनियेत रमत असल्याने मैदानावरील वावर अभावानेच झाला आहे.
प्रत्यक्ष मैदानात येऊन खेळण्याचा संबंध खूपच कमी झाला आहे.
विविध खेळ मोबाईलमध्ये आल्यानं मुलं मोबाईल हातातून सोडत नाहीत. यामुळं विद्यार्थ्यांचा शारीरिक विकास होत नाही.
चिखलात हात घालायचं म्हटलं किंवा अंगाला चिखल लागला तरी अलीकडे नको नको वाटतं.
मात्र, पावसाळ्यातील खेळ मागे पडत चालले आहेत.
हाच धागा पकडत धामोड येथील सह्याद्री हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयानं चिखल महोत्सव घेतला.
वेगळेपण दाखविणाऱ्या या चिखल महोत्सवाची आता चर्चा होऊ लागली आहे.
चिखल महोत्सवात विद्यार्थ्यांनी मनसोक्त आनंद लुटला.
मुलं मैदानात रमल्याने शिक्षकही चांगलेच आनंदी झाल्याचे दिसून आले.