Egypt Tour : IRCTC चं इजिप्तसाठी खास टूर पॅकेज, फक्त 'इतक्या' रुपयात अनेक सुविधा
IRCTC Egypt Tour : या पॅकेजची सुरुवात कोलकाता येथून होणार आहे. हे पॅकेज कोलकाता येथून सुरू होईल आणि त्यानंतर तुम्ही अबू धाबी आणि त्यानंतर अबू धाबीहून इजिप्तची राजधानी कैरोला जाल.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppIRCTC चं हे इजिप्तसाठी खास टूर पॅकेज पूर्ण 10 दिवस आणि 9 रात्रींसाठी आहे.
तुम्हीही ऑक्टोबरमध्ये इजिप्तला जाण्याचा विचार करत असाल तर हे तुमच्यासाठी एक उत्तम टूर पॅकेज आहे.
या पॅकेजमध्ये तुम्हाला इजिप्तमधील ग्रेट पिरॅमिड ऑफ गिझा, नाईल नदी क्रूझ इत्यादी अनेक ठिकाणी भेट देण्याची संधी मिळेल.
या पॅकेजमध्ये तुम्हाला नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीच्या जेवणाची सुविधा मिळेल. प्रत्येक ठिकाणी हॉटेलमध्ये राहण्याची सोय मिळेल.
संपूर्ण टूरमध्ये तुम्हाला इंग्रजी भाषिक मार्गदर्शकसोबत असेल. या पॅकेजमध्ये, तुम्हाला कोलकाता ते इजिप्तला जाण्यासाठी आणि येण्यासाठी विमान तिकिटे मिळतील.
तुम्हालाही या टूर पॅकेजचा आनंद घ्यायचा असेल, तर एकट्याने प्रवास करण्यासाठी तुम्हाला 2.06 लाख रुपये मोजावे लागतील.
तर, IRCTC इजिप्तसाठी खास टूर पॅकेजसाठी दोन लोकांना 1.82 लाख रुपये आणि तीन लोकांना 1.79 लाख रुपये खर्च करावे लागतील.