Health Tips : वेळीच सावध व्हा, तुमच्या ‘या’ सवयींमुळे शरीराचे होते मोठे नुकसान
आजकाल अनेक आजार हे आपल्याच वाईट सवयींमुळे होतात. यामध्ये मधुमेह आणि हृदयविकाराची सर्वाधिक प्रकरणे आढळतात. जेव्हा आपल्या शरीरात पोषक तत्वांची कमतरता असते आणि शारीरिक हालचाली कमी होऊ लागतात, तेव्हा अनेक रोग आपल्या मागे लागयला सुरूवात होते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशारीरिक हालचाली कमी करणे किंवा न करणे हे अनेक आजारांचे कारण आहे. शारीरिक हालचालींच्या कमतरतेमुळे शरीरातील चयापचय मंदावते ज्यामुळे पोषक तत्वे योग्य प्रकारे मिळत नाहीत. त्यामुळे नियमितपणे शारीरिक हालचाली करणे महत्त्वाचे आहे. रोज किमान 15-20 मिनिटे व्यायाम करणे गरजेचे आहे.
तणाव आणि नैराश्य ही अनेक आजारांची कारणे आहेत. तणाव आणि नैराश्यामुळे शरीरात मोठ्या प्रमाणात बिघाड होऊ लागतो. सकस आहार घ्या, रोज व्यायाम करा, पण तुम्ही जर नेहमी चिंता, तणाव, नैराश्यात राहत असाल तर हजारो रोग तुमच्या शरीरावर परिणाम करतात. तुम्ही ताण घेताच तुमची शुगर लेव्हल वाढेलच, शिवाय कोलेस्ट्रॉलची पातळीही वाढेल.
झोप आपल्यासाठी खूप महत्त्वाची आहे. जर तुम्हाला पुरेशी झोप मिळाली नाही तर तुमची तब्येत लवकरच बिघडू लागते. झोपेच्या कमतरतेमुळे इन्सुलिनचे प्रमाण कमी होऊ लागते ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढू लागते.
जर आपल्या आहारात हिरव्या भाज्यांचा अभाव असेल तर तुम्हाला अनेक आजारांचा सामना करावा लागतो. हिरव्या भाज्यांमध्ये पुरेशा प्रमाणात फायबर असते. फायबर हे आपल्या आतड्यांसाठी वरदान आहे. फायबरच्या कमतरतेमुळे लठ्ठपणा आणि कोलेस्ट्रॉल वाढते.
सिगारेट आणि अल्कोहोलमुळे तुम्हाला अनेक आजारांचा सामना करावा लागतो. सिगारेट आणि अल्कोहोलचे सेवन केल्याने रक्तातील साखर तर वाढतेच पण कर्करोगाचा धोका देखील वाढतो.
दिवसभर फ्रेश राहण्यासाठी नाश्ता करणे फार महत्वाचे आहे. सकाळी नाश्ता न करणे ही खूप वाईट सवय आहे. सकाळी नाश्ता न केल्याने तुम्हाला फ्रेश वाटते.
बाजारात उपलब्ध असणारी अनेक पेयांमध्ये कृत्रिम स्वीटनर वापरलेले असते. यामुळे शरीराचे मोठे नुकसान होते. त्यामुळे सॉफ्ट ड्रिंक्स किंवा कृत्रिम स्वीटनर मिसळलेले पेय टाळा.
आपल्यापैकी बरेच लोक रात्रभर जागतात आणि उशिरा उठतात. जर तुम्हाला निरोगी राहायचे असेल तर तुम्हाला भरपूर झोप आवश्यक आहे. यामुळे तुम्हाला कोणत्याही आजाराला सामोरे जावे लागणार नाही.
वजन कमी करण्याकरता बरेच लोक जेवण करणे टाळतात. तुम्ही पण असे करत असाल तर ते लगेचच थांबवा. एका संशोधनानुसार, जे लोक जेवण करणे टाळतात , त्यांचे वजन मोठ्या प्रमाणात वाढते.