Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Gold Investment : केवळ दागिनेच नाही तर 'हे' आहेत सोन्यातील गुंतवणुकीचे पाच पर्याय
Gold Buying: जुन्या काळापासूनच भारतात सोन्यातील गुंतवणूक ही सुरक्षित आणि चांगली समजली जाते. सामान्यत: बहुतांश लोकांना सोन्यातील गुंतवणूक हा सुरक्षित पर्याय वाटतो.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppDifferent Ways to Invest in Gold: तरुण गुंतवणूकदारांची वाढती लोकसंख्या पाहता देशात सोन्यातील गुंतवणुकीच्या पद्धतीमध्येही मोठे बदल झाले आहेत. सध्या लोक केवळ फिजिकल गोल्ड म्हणजेच दागिन्यांमध्येच नाही तर विविध पद्धतीने सोन्यात गुंतवणूक करत आहेत. सोन्यातील गुंतवणुकीच्या वेगवेगळ्या पर्यायांबाबत जाणून घेऊया.
Physical Gold : सोन्यात गुंतवणूक करण्याचा सर्वात सामान्य पद्धत म्हणजे फिजिकल गोल्डची खरेदी. यामध्ये तुम्हाला सोन्याशिवाय मेकिंग चार्जही द्यावा लागतो. फिजिकल गोल्ड हे सामान्य दागिन्यांसह सोन्याच्या नाण्यांच्या रुपातही खरेदी करु शकता.
Gold Savings Scheme : गोल्ड सेव्हिंग स्कीममध्ये गुंतवणूक हा देखील चांगला पर्याय आहे. यामध्ये गुंतवणूकदार दर महिन्याला एक छोटी रक्कम निर्धारित मुदतीसाठी गुंतवतात. यानंतर मुदत संपवल्यावर तुम्हाला बोनससह संबंधित रक्कमेतून फिजिकल गोल्डमध्ये गुंतवणूक करण्याची संधी मिळते. अनेक व्यापारी ही स्कीम ग्राहकांच्या सुविधेसाठी लॉन्च करतात.
Gold Exchange-Traded Product : गोल्ड ईटीएफ हा सोन्यात गुंतवणूक करण्याचा हा उत्तम पर्याय आहे. असे अनेक म्युच्युअल फंड आहेत, जे सोन्यात गुंतवणूक करतात. तुम्ही या गोल्ड ईटीएफमध्ये गुंतवणूक करुन फिजिकल गोल्ड इतकाच निश्चित परतावा मिळू शकतो. यात गुंतवणूक करण्यासाठी तुमाच्याकडे ट्रेडिंग अकाऊंट असणं आवश्यक आहे.
Sovereign Gold Bond Scheme : सोन्यात गुंतवणूक करण्यासाठी सॉवरेन गोल्ड बाँड स्कीम हा एक उत्तम पर्याय आहे. रिझव्र्ह बँक वेळोवेळी SBG योजना सुरु करुन गुंतवणूकदारांना सोन्यात गुंतवणुकीसाठी उत्तम पर्याय उपलब्ध करु देते.
Digital Gold : शिवाय पेटीएम, फोन पे, गुगल पे यासारखे अॅप वेळोवेळी सोन्यात गुंतवणुकीचे पर्याय घेऊन येत असतात. अशाप्रकारे अॅपद्वारे सोन्यातील गुंतवणुकीला डिजिटल गोल्ड असं नाव देण्याच आलं आहे. यामध्ये तुम्ही फिजिकल गोल्डप्रमाणे कधीही सोनं खरेदी किंवा विकू शकता.