Skin Care Tips : गुलाबाच्या पाकळ्यांचा करा 'असा' वापर, मिळेल चमकदार आणि निरोगी त्वचा
चेहऱ्याकरता जेवढे नैसर्गिक उपाय आपण करु तेवढे आपली त्वचा छान आणि चमकदार दिसते. सुंदर त्वचेकरता अनेक मुली- महिला बाजारात उपलब्ध असणारे गुलाबपाणी, गुलाब फेस पॅक, गुलाब स्क्रब आणि गुलाब तेल वापरतात. यातील रसायने तुमच्या त्वचेला खूप हानी पोहोचवतात. अशा वेळी आपण गुलाबाच्या पाकळ्या वापरून घरी गुलाब पावडर बनवू शकता. या पावडरचा वापर करून तुम्हाला असंख्य फायदे मिळू शकतात.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appगुलाबाच्या पाकळ्यांमध्ये व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के, अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म मुबलक प्रमाणात असतात. जे त्वचेसाठीही खूप फायदेशीर असतात. गुलाबाच्या पाकळ्यांपासून पावडर कशी बनवायची? ज्याच्या मदतीने तुम्ही त्वचेच्या अनेक समस्यांपासून मुक्त होऊ शकता. हे जाणून घेऊयात.
गुलाब पावडर कशी बनवायची? - गुलाबाची पावडर बनवण्यासाठी प्रथम वाळलेल्या गुलाबाची फुले घ्या. जर ताजी फुले असतील तर तेही तुम्ही वापरु शकता. यासाठी गुलाबाच्या पाकळ्या वेगळ्या करुन स्वच्छ पाण्याने धुवाव्यात. नंतर कोरडे करण्यासाठी ठेवा. 4-5 दिवसांनी सर्व पाकळ्या कोरड्या होतील. आता वाळलेल्या गुलाबाच्या पाकळ्या मिक्सरमध्ये बारीक करुन पावडर तयार करा.
चेहऱ्यावर चमक आणण्याकरता तुम्ही गुलाब पावडरचा स्क्रब म्हणून वापर करू शकता. यासाठी गुलाब पावडरमध्ये साखर मिसळून स्क्रब बनवा. आता चेहरा आणि मानेवर लावा. नंतर चेहऱ्याला हलक्या हातांनी मसाज करा आणि काही वेळाने चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा. यामुळे तुमचा चेहरा नैसर्गिकरित्या चमकेल.
डोळ्यांखालील काळेपणा दूर करण्यासाठी तुम्ही गुलाब पावडरचाही वापर करू शकता. यासाठी गुलाब पावडरमध्ये दूध मिसळून डोळ्यांच्या खाली लावा. ते सुकल्यानंतर चेहरा धुवा. यामुळे तुम्हाला डार्क सर्कल होणार नाहीत.
गुलाब पावडरच्या मदतीने तुम्ही त्वचेला क्षणार्धात ताजेतवाने करू शकता. यासाठी पाण्यात गुलाब पावडर मिसळून पेस्ट बनवा. नंतर चेहऱ्यावर लावा आणि कोरडे झाल्यानंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा. यामुळे तुमच्या चेहऱ्यावर झटपट ग्लो दिसू लागेल.
चेहऱ्यावरील मुरुम आणि डाग दूर करण्यासाठी तुम्ही गुलाब आणि चंदनाचा फेस पॅक लावू शकता. यासाठी गुलाब पावडरमध्ये चंदन पावडर आणि दूध मिसळून चेहऱ्याला लावा. आता 15-20 मिनिटांनी चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा. यामध्ये असलेले अँटी-बॅक्टेरियल घटक त्वचा स्वच्छ आणि डागरहित बनवण्यास मदत करतात.
गुलाबाची पावडर कच्च्या दुधात मिसळा आणि पेस्ट तयार करा. कच्च्या दुधामुळे त्वचा चमकदार होण्यास मदत होते आणि त्यात असलेले लॅक्टिक अॅसिड त्वचेतील बॅक्टेरिया काढून टाकून त्वचेला खोलवर स्वच्छ करते. यामुळे ओपन पोर्सची समस्या दूर होते.
तुमची स्किनला हायड्रेट ठेवण्याकरता एलोवेरा जेलमध्ये गुलाबाची पावडर मिसळून त्यात मध देखील मिसळा. आता हे मिश्रण चेहऱ्यावर लावा. याने तुमची त्वचा मऊ आणि हायड्रेट होण्यास मदत होईल.
कामाच्या व्यापात तुम्ही खूप व्यस्त आहात आणि तुम्हाला फेसपॅक लावणे जमत नसेल तर तुम्ही रोज पाण्यात गुलाब पावडर मिसळा आणि त्या पाण्याने चेहरा स्वच्छ पुसून घ्या.