Tula Shikvin Changlach Dhada : अक्षराच्या आणि अधिपतीच्या हळदीला यायला लागतंय! 'तुला शिकवीन चांगलाच धडा' मालिकेत रंगणार शुभविवाह विशेष भाग
Tula Shikvin Changlach Dhada : तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेतील अक्षरा आणि अधिपती लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत.
Tula Shikvin Changlach Dhada
1/10
'तुला शिकवीन चांगलाच धडा' या मालिकेत मागच्या काही दिवसांत खूप ट्विस्ट येऊन गेले आणि प्रेक्षकांना ही ते खूप मनोरंजक वाटत आहे.
2/10
आता पर्यंतच्या भागात आपण पहिले व्याही जेवणाचा कार्यक्रम होतो सगळे जण खूप खुश आहेत.
3/10
दुसरीकडे अधिपती भुवनेश्वरी अक्षरावर कुठल्या गोष्टीचा दबाव टाकून लग्नासाठी तयार करत आहे याचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहोत.
4/10
28 आणि 29 सप्टेंबरच्या भागात आपण अक्षराच्या मेहेंदीचा कार्यक्रम पाहणार असून अक्षरा आणि अधिपतीची हळदही जोरदार धमाक्यात साजरी होणार आहे.
5/10
दोघांच्या नात्याला नवीन वळण येणार असून या हळदीच्या सोहळ्यात नक्की काय घडेल व अजून काही जबरदस्त ट्विस्ट येईल का हे पाहणे मनोरंजक ठरेल.
6/10
अक्षरा आणि अधिपतीच्या मेहेंदी आणि हळदीचा कार्यक्रम पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.
7/10
'तुला शिकवीन चांगलाच धडा' या मालिकेतील शुभविवाह पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.
8/10
अक्षरा आणि अधिपतीचा लग्नसोहळा खूपच खास असणार आहे.
9/10
अक्षया आणि अधिपतीच्या लग्नात काय ट्वीस्ट येणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.
10/10
येत्या 1 ऑक्टोबरला अक्षरा आणि अधिपतीचा दोन तासांचा विशेष भाग पार पडणार आहे.
Published at : 27 Sep 2023 10:26 AM (IST)