World Coconut Day 2023 : 'जागतिक नारळ दिना'निमित्त वाचा या दिनाचा इतिहास

World Coconut Day 2023 : जागतिक नारळ दिवस हा मुख्यतः आशियाई पॅसिफिक देशांमध्ये साजरा केला जातो.

World Coconut Day 2023

1/10
नारळाचा उपयोग खाण्यासाठी, ओषधांसाठी, तेलासाठी तसेच इतर अनेक गोष्टींसाठी केला जातो. नारळाच्या शेतीपासून जगातल्या अनेक देशांत चांगला रोजगार मिळत आहे.
2/10
जागतिक नारळ दिवस हा मुख्यतः आशियाई पॅसिफिक देशांमध्ये साजरा केला जातो. पहिल्यांदा हा दिवस 2 सप्टेंबर 2009 रोजी साजरा करण्यात आला.
3/10
जगभरात नारळाचे उत्पादन घेतले जाते, पण आग्नेय आशियात त्याचे सर्वाधिक उत्पादन घेतलं जातं. नारळाच्या उत्पादनाच्या बाबतीत इंडोनेशियाचा जगात पहिला क्रमांक लागतो. भारतातही कोकण किनारी, गुजरात पासून ते केरळपर्यंत आणि पूर्व किनाऱ्याच्या पश्चिम बंगालपासून ते तामिळनाडूपर्यंत नारळाचे उत्पादन घेतलं जातं.
4/10
एशियन पॅसिफिक कोकोनट कम्युनिटी (APCC) ची स्थापना लक्षात ठेवणे हे जागतिक नारळ दिन साजरा करण्याचे मुख्य उद्दिष्ट आहे.
5/10
या दिवशी नारळाचे महत्त्व आणि फायदे सांगितले जातात. हा दिवस खास बनवण्यासाठी नारळ पाणी, खोबरेल तेल आणि दुधाला विशेष महत्त्व आहे.
6/10
नारळामध्ये कार्बोहायड्रेट्स, मॅगनिज आणि प्रोटिन मोठ्या प्रमाणावर असतं. त्यामुळे आपले आरोग्य चांगलं राहण्यास मदत होते.
7/10
आजारी व्यक्तींना नारळाचे पाणी प्यायचा सल्ला दिला जातो. नारळाचे दूध आणि तेल हे आपल्या त्वचेला ग्लो आणण्यासाठी फायदेशीर आहे.
8/10
नारळामध्ये आयर्न आणि सेलेनियम असते. ते एक अॅन्टिऑक्सिडन्ट स्वरुपात काम करते, त्यामुळे लाल रक्त पेशींचे संरक्षण होते. तसेच नारळ खाल्याने कोलेस्टोरॉलचा स्तर सुधारतो.
9/10
नारळात व्हिटॅमिन, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम हे घटक असतात. त्यामुळे ब्लड प्रेशर नियंत्रणात येते. नारळाचे पाणी रोज प्यायल्यास शरीरातील ग्लुकोजचे प्रमाण स्थिर राहते.
10/10
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
Sponsored Links by Taboola