PHOTO : नारळाचे 'हे' फायदे आपल्याला माहिती आहेत का? जाणून घ्या सर्वकाही
नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष म्हटलं जातं. त्यापासून निर्माण होणाऱ्या सगळ्या गोष्टी या मनुष्याला उपयोगी पडतात. नारळ हा त्यापैकीच एक.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनारळाचा उपयोग खाण्यासाठी, ओषधांसाठी, तेलासाठी तसेच इतर अनेक गोष्टींसाठी केला जातो. नारळाच्या शेतीपासून जगातल्या अनेक देशांत चांगला रोजगार मिळत आहे.
अगदी तहान भागवण्यापासून ते फर्निचर तयार करण्यापर्यंत नारळाचे असंख्य असे फायदे आहेत.
नारळामध्ये कार्बोहायड्रेट्स, मॅगनिज आणि प्रोटिन मोठ्या प्रमाणावर असतं. त्यामुळे आपले आरोग्य चांगलं राहण्यास मदत होते.
नारळाचे दूध आणि तेल हे आपल्या त्वचेला ग्लो आणण्यासाठी फायदेशीर आहे. केसांच्या आरोग्यासाठीही नारळाचे तेल वापरले जाते.
नारळामध्ये आयर्न आणि सेलेनियम असते. ते एक अॅन्टिऑक्सिडन्ट स्वरुपात काम करते, त्यामुळे लाल रक्त पेशींचे संरक्षण होते.
नारळ खाल्याने कोलेस्टोरॉलचा स्तर सुधारतो. नारळात व्हिटॅमिन, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम हे घटक असतात. त्यामुळे ब्लड प्रेशर नियंत्रणात येतं.
नारळाचे पाणी रोज पिल्यास शरीरातील ग्लुकोजचे प्रमाण स्थिर राहतं. नारळातील औषधी गुण लक्षात घेता आजारी व्यक्तींना नारळाचे पाणी प्यायचा सल्ला दिला जातो.