Suryakumar Yadav : ऐतिहासिक कॅचचा आठवा दिवस पण आठ वर्षापूर्वीचा कॅचही महत्त्वाचा, पत्नीचा फोटो पोस्ट करत सूर्याची खास पोस्ट
आयसीसी टी 20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये भारताविरुद्ध विजय मिळवण्यासाठी दक्षिण आफ्रिकेला शेवटच्या ओव्हरमध्ये 16 धावा हव्या होत्या.ओव्हरच्या पहिल्याच बॉलवर डेव्हिड मिलरनं मोठा फटका मारला होता. सूर्यकुमार यादवनं लाँग ऑफला घेतलेल्या कॅचनंतर टीम इंडियानं इतिहास रचला. सूर्यकुमारनं त्या कॅचचा संदर्भ देत एक पोस्ट केलीय.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसूर्यकुमार यादवनं पत्नी देविशा शेट्टी हिच्यासोबतचे काही फोटो इन्स्टाग्रावर शेअर केले आहेत. यामध्ये सूर्यानं काल त्या कॅचला 8 दिवस पूर्ण झाले. पण, सर्वात महत्त्वाचा कॅच आठ वर्षांपूर्वीच घेतल्याचं सूर्यकुमार यादवनं म्हटलं. सूर्यानं लग्नाच्या वाधदिवसानिमित्त ही पोस्ट केल्याचा दावा चाहत्यांनी केलाय.
सूर्यकुमार यादवनं मैत्रीण असलेल्या देविशा शेट्टीला सहा वर्ष डेट केल्यानंतर 2016 मध्ये विवाह केला. या दोघांची पहिली भेट 2010 मध्ये झाली होती.
सूर्यकुमार यादव आणि देविशा शेट्टी यांनी आरए पोद्दार कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकोनॉमिक्स विषयात पदवी पूर्ण केलीय. सूर्यकुमाकरनं देविशाला एका कार्यक्रमात नृत्य सादर करताना पाहिलं होतं. तिथंच तो तिच्या प्रेमात पडला होता.
सूर्यकुमार यादव क्रिकेटपटू असल्यानं लोकप्रिय होता. देविशा शेट्टी ही सूर्यकुमार पेक्षा तीन वर्षांनी लहान आहे. तिनं द लाईट हाऊस प्रोजेक्ट साठी देखील काम केलंय.
सूर्यकुमार यादवनं एका मुलाखतीत बोलताना क्रिकेट कारकिर्दीत देविशाच्या योगदानाबद्दल भाष्य केलं होतं.2016 पासून आयुष्य बदलून गेलं कारण त्या वर्षी लग्न झालं होतं, असं सूर्यकुमार यादव म्हणाला.
सहा वर्ष देविशा शेट्टीला डेट करत होतो त्यामुळं मी क्रिकेट खेळतो, देशांतर्गत आणि आयपीएल हे तिला माहिती होतं, असं सूर्यकुमार यादवनं सांगितलं होतं.
मिस्टर 360 अशी ओळख असलेला सूर्यकुमार यादव भारतीय क्रिकेटचं भविष्य असल्याचं बोललं जातं.