Superfoods For New Moms : प्रसुतीनंतर मातांचं आरोग्य सुधारण्यासाठी 'हे' सुपरफूड्स फायदेशीर
गरोदरपणात बहुतांश स्त्रिया स्वतःच्या आणि बाळाच्या आरोग्यासाठी पौष्टिक आहार घेतात. पण, प्रसुतीनंतर आई बाळाची काळजी घेण्यात इतकी व्यस्त होते की तिचं तिच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होते. त्यामुळे स्नायू दुखणे, डोळे कमजोर होणे, केस गळणे यांसारख्या समस्या उद्भवतात.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appतज्ज्ञांच्या मते, प्रसुतीनंतर स्वतःची तसंच बाळाची काळजी घेणं गरजेचं आहे. बाळाच्या जन्मादरम्यान आईच्या शरीरातून जास्त रक्तस्त्राव होतो आणि स्नायू कमकुवत होऊ लागतात. तसंच बाळाला दूध पाजल्याने शरीरात पोषक तत्वांची कमतरता असते. या गोष्टींमुळे शरीरात अशक्तपणा येतो.
जर तुम्ही किंवा तुमच्या घरात कोणाची नुकतीच प्रसुती झाली असेल तर या समस्या टाळण्यासाठी आहारात काही पदार्थांचा समावेश करणं अतिशय गरेजचं आहे. हे सुपरफूड्स कोणते जे खाल्ल्याने प्रसूतीनंतर तुम्हाला निरोगी वाटेल ते ते जाणून घेऊया
नव्याने आई झालेल्या आईच्या आहारात शेवग्याच्या शेंगांचा समावेश करा. कारण यामध्ये अ, ब, क जीवनसत्त्व तसंच कॅल्शियम, लोह आणि प्रथिने मुबलक प्रमाणात आढळतात. शेवग्याच्या शेंगा खाल्ल्यास आईच्या शरीरात दुधाची निर्मिती देखील वाढते.
मेथीचे दाणे जवळजवळ प्रत्येक भारतीय स्वयंपाकघरात आढळतात. आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांवर रामबाण उपाय आहे. नवीन मातांनी मेथीच्या दाण्यांचं सेवन करणं आवश्यक आहे, कारण यामुळे ऊर्जा मिळते तसंच दूध वाढण्यास मदत होते.
नवीन मातांसाठी जिरे हा स्वयंपाकघरातील एक अतिशय फायदेशीर घटक आहे. कारण त्यात अँटीऑक्सिडंट्ससोबतच लोह असते. हे खाल्ल्याने प्रसुतीनंतर अशक्तपणापासून आराम मिळतो आणि भरपूर ऊर्जाही मिळते. जिऱ्यामुळे आईच्या दुधाचे उत्पादन देखील वाढू शकतं.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.