नांदेडमधील सत्तरीतल्या मुक्ताबाईंची नक्षीदार कला
मुक्ताबाई पवार, नांदेड जिल्ह्यातल्या लोहा तालुक्यातल्या रामदास तांडा इथल्या. वयाच्या सत्तरीतही त्या न चुकता 8 ते 10 तास भरतकाम करतात.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appगेल्या 50 वर्षांपासून मी हे काम करते पण, मला कधी थकवा जाणवत नाही. आता थोडी नजर कमजोर झाली आहे. पण, हात शांत बसत नाहीत, मुक्ताबाई सांगतात.
पारंपरिक नक्षीसोबतच स्त्रिया, पर्यावरण हे विषयही त्यांनी आपल्या कलेतून मांडले आहेत.
माझं शिक्षण झालं नसलं तरी माझे पती आणि मुलगा यांच्याकडून मला सामाजिक प्रश्न समजतात. समाजात काय घडतंय यावर मुलगा सातत्यानं सांगतो. त्यातून संकल्पना ठरते. मुलगा चित्र काढतो. त्यानुसार मी धागे भरते, मु्क्ताबाई
यंत्राचा वापर न करता रंगीत धाग्यांच्या साहाय्याने मुक्ताबाईंनी तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभा पाटील, इंदिरा गांधी, किरण बेदी, सोनिया गांधी, अरुणा असफअली, कमलादेवी चटोपाध्याय, फातिमा बिबी, अमृता कौर, झाशीची राणी, सुचेता कृपलानी, पीटी उषा, सावित्रीबाई फुले, लता मंगेशकर अशा अनेक कर्तृत्ववान महिलांचं चित्र कलेतून साकारलं आहे.
या कलाकृतीला लघुउद्योग संस्था, राज्यपर्यटन विकास महामंडळ, सेंट्रल कॉटन इंडस्ट्री, केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालय यांनी आयोजित केलेल्या प्रदर्शनातून पुरस्कार मिळाले आहे.
कलाकृतींना मोठी मागणी असूनही मुक्ताबाईंनी आपल्या कलेचा उपजीविकेचं साधन म्हणून कधीच उपयोग केला नाही.
ओढणी, लेहंगा, लेडीज कोट, आधुनिक स्कर्ट, कांचळी, घुंगटो, अशा कलाकृतींची केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाने दखल घेतली आहे.
ही कला जिवंत ठेवण्यासाठी अभ्यासक्रमात या कलेचा समावेश होण्याची मागणी त्या करतात.
माजी गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे, माजी केंद्रीय राज्यमंत्री सूर्यकांता पाटील, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अनेक मान्यवरांनी मुक्ताबाईंच्या कलेला दाद दिली आहे.