Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Onion : कांदा खरेदीबाबत नाफेडने बाजारात हस्तक्षेप करावा, केंद्र सरकारचे निर्देश
सध्या कांदा (Onion) उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. कारण कांद्याच्या दरात (Onion Price) मोठी घसरण होत असल्याचं चित्र दिसत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकेंद्र सरकारनं कांदा खरेदीबाबत बाजारात तत्काळ हस्तक्षेप करण्याचे नाफेड आणि नॅशनल कन्झ्युमर्स को-ऑपरेटिव्ह फेडरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (National Cooperative Consumers Federation) ला निर्देश दिले आहेत.
कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, नाफेडने ताबडतोब कांदा खरेदीची प्रक्रिया सुरु केली आहे.
गेल्या दहा दिवसात शेतकऱ्यांकडून 900 रुपये प्रति क्विंटल पेक्षा जास्त दराने सुमारे 4000 मेट्रीक टन कांद्याची थेट खरेदी केल्याची माहिती कृषी मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.
नाफेडने 40 खरेदी केंद्रे उघडली असून, तिथे शेतकरी त्यांचा कांदा विकू शकतात. त्याचे पैसे ऑनलाइन त्यांना मिळू शकतात.
नाफेडने खरेदी केंद्रांवरुन दिल्ली, कोलकाता, गुवाहाटी, भुवनेश्वर, बंगळुरु, चेन्नई, हैदराबाद आणि कोची या ठिकाणी साठा नेण्याची व्यवस्था केली आहे.
2022-23 मध्ये कांद्याचे अंदाजे उत्पादन 318 लाख मेट्रिक टन होणार आहे. जे मागील वर्षीच्या 316.98 लाख मेट्रिक टनापेक्षा जास्त आहे.
दरातील ही घसरण इतर राज्यांतील एकूणच वाढलेल्या उत्पादनामुळं तसेच देशातील प्रमुख उत्पादक जिल्ह्यांतील म्हणजेच नाशिकमधील पुरवठ्यावरील अवलंबित्व कमी झाल्यामुळं असल्याचं तज्ज्ञांनी म्हटलं आहे.
दरात घसरण झाल्यामुळं कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात.
सर्व राज्यांमध्ये कांद्याची पेरणी केली जाते. राष्ट्रीय उत्पादनात सुमारे 43 टक्के वाट्यासह महाराष्ट्र आघाडीवर आहे. तर मध्य प्रदेशचा 16 टक्के वाटा आहे.