Sleepiness During Office : तुम्हाला ऑफिसमध्ये झोप आणि सुस्तपणा जाणवतो, याचे कारण काय आहे? वाचा
9 - 5 नोकरी करणाऱ्या लोकांकरता दुपारची वेळ मोठी जोखमीची असती.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयाचे कारण म्हणजे जेवणानंतर त्यांना सुस्तपणा जाणवतो.
पण आॅफिसच्या वेळेत झोप येणे किंवा सुस्तपणा जाणवणे याचे कारण म्हणजे अन्न चुकीच्या वेळी खाणे.
साधारणपणे 1.27 ते 2.06 सुस्तपणा किंवा तुम्हाला झोप येऊ शकते.
या काळात आॅफिसमधले काम करावेसे वाटत नाही.
तर कधी थकव्यामुळे कर्मचारी नीट काम करू शकत नाहीत.
संगणकासमोर जास्त वेळ घालवणे, कामाच्या दरम्यान ब्रेक न घेणे आणि सहकाऱ्यांकडून त्रास होणे हे देखील आळसाचे कारण असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
त्यामुळे कामावर लक्ष केंद्रित करता येत नाही.
खरं तर, दिवसभरात एक अशी वेळ असते जेव्हा कार्यालयातील कर्मचारी सर्वात जास्त सक्रिय असतात, तर एक वेळ अशी देखील असते जेव्हा त्यांना थकवा जाणवतो.
एका सर्वेक्षणानुसार, सकाळी 10.22 च्या दरम्यान ऑफिसमध्ये सर्वात जास्त काम केले जाते.