Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Ganesh Chaturthi 2023 : गणेशोत्सवानिमित्त उपवास करणार आहात? उपवास करताना 'या' गोष्टींची काळजी आवर्जून घ्या
गणेश चतुर्थी उद्यावर येऊन ठेपली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआपल्या सर्वांचे लाडके बप्पा 10 दिवसांकरता आपल्यासोबत असणार आहेत.
अनेक लोक गणपतीच्या काळात उपवास करतात. उपवासाच्या दिवसात शरीराला तंदुरुस्त ठेवण्याकरता काही टिप्स फाॅलो करणे गरजेचे आहे. काय आहेत या टिप्स जाणून घेऊयात.
ड्रायफ्रूट्स आणि फळे खा : उपवास करताना तुम्ही चांगेल पदार्थ खाणं गरजेचं आहे. फळांमध्ये जास्त प्रमाणात प्रोटीन, जीवनसत्वे असतात. जे शरीराला सुदृढ ठेवण्यास मदत करतात. उपवास केल्यावर ड्रायफ्रूट्स खाणे देखील तितकेच गरजेचे आहे. यामुळे तुम्हाला ताकद मिळू शकते.
पुरेसे हायड्रेशन : उपवासाच्या दिवसात हायड्रेटेड राहणे खूप गरजेचे आहे. या दिवसात तुम्ही ताक, पाणी, नारळाचे पाणी, लिंबू पाणी सतत पिणे आवश्यक आहे.
दुग्धजन्य पदार्थ : दूध आणि दुग्धजन्य पदार्थ सामान्यतः उपवासादरम्यान वापरले जातात कारण या पदार्थांमध्ये प्रथिने, कॅल्शियम, जीवनसत्त्वे असतात.
तळलेले अन्न टाळा : उपवास केल्यास तळलेले अन्नपदार्थ खाणं पूर्णपणे टाळा. कारण यामुळे तुमच्या शरीराला हानी पोहोचू शकते.
विश्रांती घ्या : उपवास करताना स्वतःला चार्ज करण्यासाठी पुरेशी विश्रांती आवश्यक आहे. आवश्यक असल्यास दुपारची झोप घ्या आणि वेळेवर झोपण्याचा प्रयत्न करा.
संतुलित आहार : तुमच्या आहारात कार्बोहायड्रेट, प्रथिने, जीवनसत्त्वे, खनिजे, भरपूर पाणी आणि फायबर यांचा समावेश करा. यामुळे तुम्ही निरोगी राहू शकता.
जागरण करु नका : उपवास केल्यावर झोपेचे एक वेळापत्रक ठरवा. ज्यामुळे तुमची झोप पूर्ण होऊ शकते आणि तुम्हाला थकवा जाणवणार नाही.