How To Grow Nails Faster And Beautiful : सुंदर नखे मिळवण्यासाठी आणि झटपट नखं वाढवायची असतील तर करा 'हे' घरगुती उपाय
हातांच्या सौंदर्यात लांब आणि सुंदर नखे खूप महत्त्वाची भूमिका बजावतात. हाताच्या लांब नखांवर रंगीबेरंगी नेलपॉलिश म्हणजे काही औरच. परंतु काही स्त्रिया आणि मुली या गोष्टीमुळे त्रस्त राहतात की, सर्वोतोपरी प्रयत्न करूनही त्यांची नखे लांब होत नाहीत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअनेकांना अशी समस्या असते की त्यांची नखे खूप कमकुवत होतात आणि वाढतात तेव्हा तुटतात. विशेषत: ज्या मुलींना नखांची समस्या असते, त्यांच्या हातांचे सौंदर्य यामुळे कमी होते.
अशा अनेक मुली आणि महिला आहेत ज्यांची नखे आपोआप पिवळी पडतात. ही काही आजाराची चिन्हे देखील असू शकतात, परंतु तसे नसल्यास, आपण आपल्या हातांची नखे अधिक सुंदर, चमकदार आणि मजबूत कशी बनवू शकता हे पाहुयात.
जर तुमचे नखे चमकदार नसतील तर एका भांड्यात पाणी घेऊन त्यात थोडासा बेकिंग सोडा टाका आणि त्यात तुमची नखे जास्त वेळ बुडवून ठेवा. 20-25 मिनिटांनंतर, आपले हात पाण्यामधून बाहेर काढा आणि कापसाच्या गोळ्यांनी स्वच्छ करा. तुम्हाला लगेच फरक जाणवेल.
विशेषत: स्वयंपाकघरात काम करणाऱ्या महिलांची , मुलींची नखे बहुतांशी पिवळी दिसतात. अशा स्थितीत एका भांड्यात पाणी घेऊन त्यात 1-2 लिंबू पिळून त्यात हात 15-20 मिनिटे बुडवा. आपले हात बाहेर काढा आणि स्वच्छ पाण्याने धुवा आणि नंतर थोडी क्रीम लावा. हाताचा पिवळेपणा कमी होईल.
अनेकांना ही समस्या असते की नखांजवळ मांस बाहेर येऊ लागते, त्याला क्यूटिकल म्हणतात आणि बाजारात खूप चांगले क्यूटिकल ऑईल उपलब्ध आहेत जे तुम्ही त्या भागावर लावू शकता.
अनेकांची नखे खूप कोरडी दिसतात. सर्व प्रथम, अशा लोकांनी भरपूर पाणी प्यावे, परंतु तरीही हे होत आहे, तर आपण नियमितपणे त्यांना तेल किंवा क्रीम लावावे. बदामाचे तेल लावल्यास त्याचा अधिक फायदा होतो.
नखे वाढवण्यासाठी एका भांड्यात एक चमचा लिंबाचा रस आणि ऑलिव्ह ऑईल मिक्स करा. आता हे मिश्रण कोमट करा. नंतर त्यात 10 मिनिटे बोटे बुडवून ठेवा. नंतर स्वच्छ पाण्याने धुवा.
चमचाभर नारळाच्या तेलात समप्रमाणात मध मिसळा. यामध्ये काही थेंब रोजमेरी ऑईल मिसळा. हे सारे मिश्रण कोमट स्वरूपात गरम करून नखांना मसाज करा.
नारळाचे तेल नखे वाढवण्याचा एक प्रभावी मार्ग मानला जाऊ शकतो. वास्तविक, नारळाचे तेल बुरशीजन्य संसर्ग बरे करण्यास मदत करू शकते आणि या कारणास्तव नारळाच्या तेलाचा वापर नखांच्या वाढीसाठी उपाय म्हणून केला जाऊ शकतो. यासाठी एका भांड्यात खोबरेल तेल गरम करा. आता तुमच्या बोटांना आणि नखांना गोलाकार पद्धतीने मसाज करा. ते रात्रभर तसेच ठेवा. त्यानंतर सकाळी कोमट पाण्याने बोटे आणि नखे धुवा.