Capsicum For Weight Loss: तुम्हाला वजन कमी करायचं असेल, तर 'या' तीन पद्धतीने शिमल मिरची खाच
तुमच्यातील बऱ्याजणांना शरीराचं वजन वाढल्यामुळे टेन्शन येत असेल. एकदा शरीराचं वजन वाढलं तर पुन्हा ते कमी करणं कठिण असतं. कारण त्यासाठी नियमपणे आहाराचे काही नियम पाळावे लागतात. तुमच्या दररोजच्या लाईफस्टाईलमध्ये थोडा बदल करायची तयारी असेल, तर निश्चितपणे शरीराच्या वजनात घट करू शकता. यासाठी तुमच्या आहारात शिमला मिरचीचा समावेश केला, तर तुम्हाला शरीराचं वजन कमी करण्यासाठी मदत होईल.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appतुम्हाला मनापासून वजन कंट्रोल करायचं असेल किंवा वजन कमी करायचं असेल, तर तुमच्या आहारात शिमला मिरचीचा आवर्जुन समावेश करा. पण आहारात शिमला मिरचीचा समावेश करण्यापूर्वी कोणत्या पद्धतीने खाल्लं तर फायदेशीर ठरू शकतं. हे जाणून घ्या.
आहारात बहुतेकांना शिमला मिरची खायला आवडते. शिमला मिरचीपासून वेगळ्यावेगळ्या प्रकारचे पदार्थही तयार करता येतात. जे तुमच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतं.
मात्र, अनेक लोकांना शिमला मिरचीचे आरोग्यादायी फायदे माहिती नसतात
शिमला मिरचीत कॅलरीज, पाणी, प्रथिने, कार्ब्स, साखर, फायबर आणि फॅट यांसारखे पोषक तत्व आढळतात. तसेच यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात आढळून येतं. यामुळे तुमची स्किन आणि केस निरोगी राहण्यास मदत मिळते
शिमला मिरचीचं सूप करून प्या : तुम्ही शिमला मिरचीचं सूप करूनही पिऊ शकता. शरीरासाठी हे सुप खूप हेल्दी असतं. सुप तयार करण्यासाठी शिमला मिरचीसोबत हिरव्या पालेभाज्यांना मिक्स करून चांगल शिजवून घ्या.यानंतर वरून आवश्यकतेनुसार कोथिंबीरीची पानं आणि लसण टाका. तसेच सुपात चवीसाठी वरून मीठाचा वापर करा
शिमला मिरची तळून खा : आहारात तळलेल्या शिमल्या मिरचीचा समावेश करा. यामुळे वेगानं वजन कमी होऊ शकतं. तसेच शिमला मिरची आरोग्यासाठी अनेक फायदेही आहेत. यामध्ये कॅप्सॅसिनोईड्सचं प्रमाण असतं.यामुळे तुमच्या मेटाबॉलिज्म सिस्टीममध्ये सुधारणा करण्यास मदत मिळू शकते आणि शरीरातील ब्लड सर्कुलेशनही नियंत्रित राहतं.
शिमला मिरची प्रोटीन शेक : तुम्ही शिमला मिर्चीपासून प्रोटीन शेक बनवून पिऊ शकता. तुम्हाला प्रोटीन शेक बनवायचं असेल, तर शिमला मिरची, ब्रोकोली आणि प्रोटीन पाऊडर यांची आवश्यकता असेल. यांना एका मिक्सरमध्ये टाकून मिश्रण तयार करावं लागेल.यामध्ये लिंबू आणि मीठाचाही समावेश करा. यानंतर तुमचं शिमला मिरची प्रोटीन शेक तयार होईल
वरील तीन पद्धतीने शिमल मिरची खाल्लं तर वजन घटण्यास मदत मिळू शकते. तसेच शिमला मिरचीच्या बियांमध्ये सायटोकेमिकल्स व फ्लेव्हॉइड्सचं प्रमाण असतं. यामुळे हृदयाचं आरोग्य चांगलं राहण्यास मदत मिळू शकते
तुमच्या दैनंदिन आहारात शिमला मिरचीचा समावेश कराच. पण नियमितपणे व्यायाम करण्यावरही भर द्यायला हवा. सकाळी पायी चालण्याचा व्यायाम करायल हवा. यामुळे तुमचं वजन नियंत्रित रहिल आणि आरोग्याचे अनेक फायदेही मिळतील.