Watermelon Seeds : कलिंगडासोबतच कलिंगडाच्या बिया देखील आरोग्यास फायदेशीर ठरतात, फायदे वाचून व्हाल थक्क..

कलिंगडाच्या बियांमध्ये प्रोटीन, कार्बोहाइड्रेट, कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम, फॉस्फरस, पोटॅशिअम, सोडिअम, झिंक, तांबे, फोलेट, फॅटी ॲसिड ही पौष्टिक तत्वे आढळतात. (Photo Credit : unsplash)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यास कलिंगडाच्या बिया मदत करतात, त्यामुळे हृदयाचे आरोग्य चांगले राहते. हृदयाच्या समस्या दूर ठेवण्यास मदत होते.(Photo Credit : unsplash)

शरीरात पुरेशा प्रमाणात मॅग्नेशियम असल्यास रोग प्रतिकारकशक्ती वाढते, त्यामुळे शरीराला होणाऱ्या संसर्गापासून संरक्षण मिळते.(Photo Credit : unsplash)
कलिंगडाच्या बियांमध्ये असलेले झिंक हे पुरुषांची प्रजनन क्षमता सुधारण्यास मदत करते. झिंकचे सेवन केल्याने पुरुषांच्या शुक्राणूंची गुणवत्ता वाढू शकते. (Photo Credit : unsplash)
कलिंगडाच्या बियांमध्ये फॅटी ॲसिड चे घटक असतात. जे टाईप-2 मधुमेहाला प्रतिबंधित करण्यास मदत होते. कलिंगडाच्या बियांमुळे ग्लुकोजची पातळी कमी होण्यास मदत होते. (Photo Credit : unsplash)
कलिंगडाच्या बिया बारीक करून चेहऱ्यावर लावल्यास त्वचेचा टोन सुधारतो आणि त्वचा तजेलदार होण्यास मदत होते. चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होतात. कलिंगडाच्या बियांमधून निघणाऱ्या तेलाचा वापर स्किनसाठी केला जातो. (Photo Credit : unsplash)
शरीरात मॅग्नेशियमची कमतरता असल्यास मेंदूची लक्षात ठेवण्याची क्षमता कमी होऊ लागते त्यामुळे कलिंगडाच्या बियांचे सेवन केल्यास मेंदूचे आरोग्य सुधारते. (Photo Credit : unsplash)
कलिंगडाच्या बियांमध्ये कॅल्शियमचे प्रमाण जास्त असते त्यामुळे स्नायू आणि हाडे मजबूत होण्यास मदत होते. हाडांची घनता वाढवण्यासाठी कलिंगडाच्या बिया फायदेशीर आहेत. (Photo Credit : unsplash)
कलिंगडाच्या बियांमध्ये फायबरचे प्रमाण भरपूर असते त्यामुळे पचनक्रिया सुधारते. कलिंगडाच्या बियांमधील सर्व पोषक घटक शरीराची चयापचय क्रिया जलद करण्यास मदत करतात. (Photo Credit : unsplash)
कलिंगडाच्या बियांमध्ये कॅलरीजचे प्रमाण कमी असते जे वजन कमी करण्यासाठी उपयुक्त ठरते. लठ्ठपणावर नियंत्रण ठेवून आपले अनेक आजारांपासून संरक्षण करते. (Photo Credit : unsplash)
वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. (Photo Credit : unsplash)