Truck Driver Strike: हिट अँड रन कायद्याविरोधात ट्रान्सपोर्ट युनियनचा संप; इंधन तुटवड्याची नागरिकांमध्ये भीती, पेट्रोल पंपावर गर्दी

आज या संपाचा दुसरा दिवस आहे. त्यामुळे आजपासून सर्व खासगी बसच्या चालकांसह इंधन वाहतूक करणाऱ्या टँकरचे चालकही संपावर जाणार आहेत. राज्यात अनेक ठिकाणी पेट्रोल पंपावर पेट्रोल, डिझेल भरण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
ट्रक चालकांच्या संपामुळे पेट्रोलची वाहतूक होणार नसल्याने नागरिकांनी वाहनांमध्ये पेट्रोल भरण्यासाठी पंपावर मोठ्या रांगा लावल्या आहेत.

छत्रपती संभाजीनगरमध्ये एसटी महामंडळाकडे दोन दिवस पुरेल एवढाच डिझेलचा पुरवठा शिल्लक आहे. त्यामुळे ट्रकचालकांच्या संपाचा एसटीवरही परिणाम होण्याची शक्यता आहे.
मुंबईतही या संपाचा परिणाम आता मुंबईतही दिसून येत आहे. काही दिवस पेट्रोलच्या टंचाईला जाण्याच्या भीतीने मुंबईतील कुर्ल्यातील पेट्रोल पंपावर काही लोकांनी ड्रममध्ये पेट्रोल भरुन नेलं.
पेट्रोलबाबत व्हॉट्सअॅपवर मेसेज आल्याचं काही जणांनी सांगितलं. त्यानंतर पेट्रोल पंपांवर पेट्रोल-डिझेल भरण्यासाठी मोठी गर्दी झाली.
राज्यात पेट्रोल तुटवडा होणार असल्याची चर्चा सुरू झाल्यानंतर सगळ्याच जिल्ह्यात पेट्रोलपंपावर वाहन चालकांची गर्दी उसळली आहे.
राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांना शासनाकडून पत्रक जारी करण्यात आले आहे.
नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी तात्काळ उपाययोजना करण्याचे निर्देश सरकारने दिले आहे. त्याशिवाय, तेल कंपन्यांना आवश्यक सहकार्य करा अशी सूचना देण्यात आली आहे.
संपात सहभागी वाहतूकदारांकडून कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी काळजी घेण्याच्या सूचना सरकारने प्रशासनाला दिल्या आहेत.