Arun Yogiraj : आयोध्येचा राजाच नाही, तर योगीराज ने साकारल्यात या सुंदर मूर्ती! दिलंय दगडाला देवपण!
अरुण योगीराज हा कर्नाटकातील मैसूर शहरातील रहिवासी आहे. प्रसिद्ध शिल्पकारांच्या कुटुंबातील तो आहे. त्यांच्या ५ पिढ्या मूर्ती कोरण्याचे काम करत आल्या आहेत. (Photo credit : Instagram/@arun_yogiraj)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअरुण हा देशातील सर्वात प्रसिद्ध शिल्पकारांपैकी एक आहे. देशातील विविध राज्यांमध्ये अरुणच्या कोरीव मूर्तींना मोठी मागणी आहे. (Photo credit : Instagram/@arun_yogiraj)
खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अरुणच्या कलेचे कौतुक केले आहे. आपल्या कौशल्याचा वापर करून अरुणने अनेक शिल्पे तयार केली आहेत. (Photo credit : Instagram/@arun_yogiraj)
अरुणचे वडील योगीराज हे देखील उत्कृष्ट शिल्पकार आहेत. (Photo credit : Instagram/@arun_yogiraj)
अरुण योगीराज याचा लहानपणापासूनच शिल्पकलेशी संबंध आहे. (Photo credit : Instagram/@arun_yogiraj)
एमबीए झाल्यानंतर त्यांनी काही काळ खासगी कंपनीत नोकरीही केली. मात्र, त्याच्यातील शिल्पकाराला तो फार काळ लपवू शकला नाही, याच कारणामुळे 2008 मध्ये त्यांनी शिल्पकलेची कारकीर्द सुरू केली. (Photo credit : Instagram/@arun_yogiraj)
इंडिया गेट येथील सुभाषचंद्र बोस यांचा 30 फूट उंच पुतळा अरुण योगीराज यांनी तयार केला आहे. (Photo credit : Instagram/@arun_yogiraj)
नेताजींच्या १२५व्या जयंतीपूर्वी पंतप्रधान मोदींनी स्वातंत्र्यलढ्यातील त्यांच्या योगदानाबद्दल इंडिया गेटवर पुतळा बसवण्याची इच्छा व्यक्त केली. अरुण योगीराज यांनी ३० फूट उंच पुतळा बनवून पंतप्रधान मोदींची ही इच्छा पूर्ण केली. त्यांनी सुभाषचंद्र बोस यांचा दोन फूट उंच पुतळाही पंतप्रधान मोदींना दिला,ज्याबद्दल पंतप्रधानांनी त्यांचे आभार मानले. (Photo credit : Instagram/@arun_yogiraj)
अरुण योगीराज यांनी केदारनाथमध्ये आदि शंकराचार्यांची १२ फूट उंचीची मूर्तीही बनवली. (Photo credit : Instagram/@arun_yogiraj)
मैसूर जिल्ह्यातील 21 फूट उंचीची हनुमानाची मूर्ती, संविधान निर्माता डॉ. आंबेडकर यांचा 15 फूट उंच पुतळा, मैसूरमधील स्वामी रामकृष्ण परमहंस यांची पांढरी अमृतशीला मूर्ती, नंदीची 6 फूट उंचीची अखंड मूर्ती, 6 फूट उंचीची मायसूर देवीची मूर्ती, डॉ. राजा जयचामराजेंद्र वोडेयर यांची 14.5 फूट उंच पांढरी अमृतशिला पुतळा आणि इतर अनेक पुतळे अरुण योगीराज यांनी कोरले होते. मैसूरच्या राजाची 14.5 फूट उंच पांढरी अमृतशीला मूर्ती बनवली. अशी इतर अनेक शिल्पे अरुण योगीराजांनी कोरलेली आहेत. (Photo credit : Instagram/@arun_yogiraj)