Fashion Tips : वन पीसमध्ये क्लासी दिसायचे आहे? या चुका टाळल्यास मिळेल परफेक्ट लुक
वन पीस हा महिलांच्या आवडत्या ड्रेसपैकी एक आहे. विशेषत: कोणत्याही विशेष पार्टीत बहुतेक महिला वन पीस घालण्याला प्राधान्य देतात. मात्र, महिला अनेकदा वन पीस घालताना काही चुका करतात, ज्यामुळे त्यांचा संपूर्ण लुक खराब होतो. अशा परिस्थितीत, वन पीस कॅरी करण्यापूर्वी काही गोष्टींची विशेष काळजी घेतल्यास, तुम्ही क्षणार्धात सर्वोत्तम लुक मिळवू शकता.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appवन पीस घालणे हे महिलांसाठी खूप सोपे काम आहे. त्याचबरोबर महिलांनाही वन पीसमध्ये आरामदायक वाटते. मात्र, पार्टीत सहभागी होण्यासाठी फक्त वन पीस घेणं पुरेसे नाही. या काही फॅशन टिप्स फाॅलो केल्या तर तुम्ही सर्वात सुंदर दिसू शकता.
वन पीससोबत जड दागिने घालण्याची चूक कधीही करू नका. अर्थात तुमचा वन पीस साधा आहे, पण त्याच्या लांबीमुळे तो खूपच भारी दिसतो. अशा स्थितीत जड दागिने घातल्याने तुमचा संपूर्ण लुक खराब होऊ शकतो. त्यामुळे वन पीस हलका असो वा जड, त्यासोबत हलके दागिने घालणे केव्हाही चांगले.
हाय हिल्स वन पीससोबत खूप सुंदर दिसतात. यामुले तुम्ही केलेला लुक खुलून दिसतो. तसेच उंची देखील हाय हिल्समुळे चांगली दिसते.
तुम्ही उत्तम हेअरस्टाईलने तुमचा लुक चांगला बनवू शकता. अशा परिस्थितीत वन पीसची नक्षी लक्षात घेऊन हेअरस्टाईल निवडा. मिरर वर्क वन पीसवर बन बनवणे हा एक चांगला पर्याय आहे. हे तुमचे केस वन पीसमध्ये अडकण्यापासून वाचवते. जर तुमचे केस लहान असतील तर तुम्ही तुमचे केस देखील मोकळे सोडू शकता.
वन पीसमध्ये सुंदर दिसण्यासाठी स्त्रिया अनेकदा जास्त मेकअप करतात. पण हेवी मेकअप वन पीसवर अजिबात शोभत नाही. अशा परिस्थितीत, उत्कृष्ट मेकअप लूक मिळविण्यासाठी, तुम्ही वन पीससोबत लाईट किंवा न्यूट्रल टोनचा मेकअप करू शकता. यामुळे तुमचा लुक अधिक छान होतो.
तुम्ही रात्रीच्या पार्टीसाठी वन पीस शोधत असाल तर काळा हा असा रंग आहे की तो परिधान केल्याने तुम्ही स्लिम आणि हॉटही दिसाल. पार्टीमध्ये तुम्ही हाय हिल्ससोबत वन पीस कॅरी करू शकता.
रात्रीच्या पार्टीसाठी गोल्डन वन पीस हा उत्तम पर्याय आहे. यासोबत बोल्ड मेकअप तुमचा लुक पूर्ण करेल.
जर तुम्ही सिल्व्हर कलरच्या ड्रेससोबत डार्क मेकअप केला तर तो तुमचा लुक पूर्ण करेल. यामध्ये तुमचे फोटोही चांगले दिसतील.
लाल हा एक रंग आहे जो तुम्ही दिवसा आणि रात्री दोन्ही वेळी परिधान करू शकता. लाल रंगाचा वन पीस परिधान करताना मेकअपची विशेष काळजी घ्या. यासोबत लाल लिपस्टिक चांगली दिसेल.