Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Children Room Decoration Ideas : मुलांच्या खोलीची सजावट कशी असावी? फॉलो करा या टिप्स
आजकाल बहुतेक लोक घरात मुलांना वेगळी खोली देतात. पण मुलाची खोली सजवणे हे खूप अवघड काम आहे. अशा परिस्थितीत सजावटीच्या काही टिप्स फॉलो करून तुम्ही मुलांच्या खोलीला वेगळे लुक देऊ शकता. या पद्धती केवळ खोलीला सुंदर लुक देण्यास मदत करतील असे नाही तर मुलांना ते पाहून छान देखील वाटू शकते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appघरात मुलांसाठी स्वतंत्र खोली असल्यास, मुलांना त्यांच्या खोलीत जास्तीत जास्त वेळ घालवायला आवडते, म्हणून पालकांनी मुलांची खोली अशा प्रकारे सजवणे महत्वाचे आहे की तेथे मुलांना सकारात्मक वाटेल.
मुलांना रंगीबेरंगी गोष्टी जास्त आवडतात. अशा स्थितीत मुलांच्या खोलीला त्यांच्या आवडत्या रंगात रंगवणे चांगले होईल. आपण यासाठी थीम देखील ठरवू शकता. जर तुमचा वास्तूवर विश्वास असेल तर खोलीची सकारात्मकता टिकवून ठेवण्यासाठी तुम्ही खोलीला वास्तुनुसार देखील रंगवू शकता.
खोलीसाठी फर्निचर सेट करताना सुरक्षिततेची विशेष काळजी घ्या. खोलीत धारदार र्निचर कधीही ठेवू नका. यामुळे मुलांना दुखापत होऊ शकते. खोलीला सुंदर लुक देण्यासाठी तुम्ही रंगीबेरंगी मच्छरदाणी वापरू शकता.
अभ्यासाचे टेबल मुलासाठी व्यवस्थित सेट करा. यासोबतच तुम्ही अभ्यासाच्या टेबलावर सकारात्मक ऊर्जा देणारी झाडे देखील ठेऊ शकता. त्यांचे सर्व महत्वाचे सामान स्डटी टेबलवर बसेल. याचा विचार करून स्डटी टेबल विकत आणा किंवा बनवून घ्या.
खोलीला आकर्षक लुक देण्यासाठी तुम्ही मुलांच्या आवडत्या वॉलपेपरने भिंती सजवू शकता. ज्यावर कार्टून, ढग किंवा सुंदर फुले असू द्या. यामुळे खोली सुंदर दिसेल, आणि मुले भिंतींना घाण करू शकणार नाहीत आणि भिंती स्वच्छ राहतील.
मुलांच्या खोल्या सजवण्यासाठी महागड्या पेंटिंगची गरज नाही. तुम्ही हाताने बनवलेले क्राफ्ट किंवा तुमच्या मुलांनी बनवलेले क्राफ्ट याचा वापर रूम सजवताना करा.
सजावटीच्या वेळी मुलांच्या बेडकडे विशेष लक्ष द्या. बेड जास्त लहान किंवा फार मोठेही नसावेत. मुलांना कंफर्ट मिळेल असे ते असावेत. त्यावर झोपून त्यांना आराम मिळेल असे बेड खरेदी करावेत.
मुलांच्या खोलीत सूर्यप्रकाश आणि हवा बाहेरून येण्याची व्यवस्था करावी, यामुळे त्यांच्यात सकारात्मक ऊर्जा पसरण्यास मदत होते.
लहान मुलांच्या खोलीत टीव्ही, लॅपटॉप इत्यादी इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स शक्यतो कमी ठेवा. मन विचलित करण्याचे काम करते. मुलांची खोली व्यवस्थित ठेवावी आणि त्यांनाही ही सवय लावावी.