Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Walnut Benefits : छोट्याशा अक्रोडचे बहुगुणी फायदे
मधुमेहाच्या रुग्णांनी ड्रायफ्रूट्सचे सेवन करावे. ड्रायफ्रूट्स आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. रोज मूठभर ड्रायफ्रूट्स खाल्ल्याने अनेक आजार दूर राहतात.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजर तुम्ही सर्व ड्रायफ्रूट्स खाऊ शकत नसाल तर मधुमेहामध्ये तुम्ही दररोज 2 अक्रोड खावेत. रोज अक्रोड खाल्ल्याने रक्तातील साखर नियंत्रित राहण्यास मदत होते.
अक्रोडमध्ये फायबर, जीवनसत्त्वे, खनिजे, प्रथिने आणि निरोगी चरबी आढळतात. अक्रोड हे कॅल्शियम, मॅग्नेशियम, लोह, फॉस्फरस, तांबे, सेलेनियम यांसारख्या खनिजांचा चांगला स्रोत आहे.
याशिवाय अक्रोडमध्ये ओमेगा ३ फॅटी अॅसिड मुबलक प्रमाणात असते. हे तुमचे हृदय निरोगी ठेवण्यास मदत करते. जाणून घ्या मधुमेहामध्ये अक्रोड किती फायदेशीर आहे.
मधुमेहाच्या रुग्णाने फायबर आणि जीवनसत्त्वे युक्त आहार घ्यावा. यासाठी तुम्ही दररोज दोन भिजवलेल्या अक्रोडाचे सेवन करावे. त्यामुळे मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यास मदत होईल.
आपण कोणताही आहार घेतो त्याचा थेट परिणाम आपल्या शरीरातील रक्तातील साखरेच्या पातळीवर होतो. अशा परिस्थितीत मधुमेही रुग्णाने रक्तातील साखर नियंत्रित ठेवणारा आहार घ्यावा. अक्रोडमध्ये असे गुणधर्म असतात जे रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास मदत करतात.
अक्रोड खाल्ल्याने लठ्ठपणा कमी होण्यास मदत होते. हे फायबर, प्रथिने आणि निरोगी चरबीचा चांगला स्रोत आहे. या पोषक तत्वांनी लठ्ठपणावर नियंत्रण ठेवता येते.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.