Ved : चौथ्या आठवड्यातही 'वेड'ची घौडदौड सुरुच!
'वेड' या सिनेमाने आतापर्यंत 50 कोटींपेक्षा अधिक कमाई केली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appरितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुखचा 'वेड' हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे.
कोरोनानंतर सर्वाधिक कमाई करणाऱ्या या मराठी सिनेमाची क्रेझ दिवसेंदिवस वाढतच चालली आहे.
कोरोनानंतर प्रेक्षकांची पाऊले पुन्हा एकदा सिनेमागृहाकडे वळवण्यात या सिनेमाला यश आलं आहे.
प्रेक्षकांना वेड लावण्यात हा सिनेमा यशस्वी झाला आहे.
रितेश-जिनिलिया या क्युट कपलचा ऑनस्क्रीन रोमॅंटिक अंदाज चाहत्यांना चांगलाच भावला आहे.
'वेड' या सिनेमाने रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे.
रिलीजच्या पहिल्या आठवड्यात या सिनेमाने 20.18 कोटी तर दुसऱ्या आठवड्यात 20.67 कोटींची कमाई केली आहे.
'वेड' हा सिनेमा 2019 साली प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या 'मजिली' या दाक्षिणात्य सिनेमाचा रिमेक आहे.
वेड लवकरच सैराटचा रेकॉर्ड मोडणार आहे.